जाहिरात

'विनेश फोगाटनं कट रचला, देशाची माफी मागावी', ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडूचा गंभीर आरोप

Yogeshwar Dutt on Vinesh Phogat : देशातील प्रमुख कुस्तीपटूंचा  कुस्तीच्या मॅटपासून ते राजकीय आखाड्यापर्यंत पोहचला आहे.

'विनेश फोगाटनं कट रचला, देशाची माफी मागावी', ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडूचा गंभीर आरोप
मुंबई:

देशातील प्रमुख कुस्तीपटूंचा  कुस्तीच्या मॅटपासून ते राजकीय आखाड्यापर्यंत पोहचला आहे. भारताची प्रमुख महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात अपयश आलं. विनेशचं वजन 50 ग्रॅम जास्त भरल्यानं तिला फायनलपूर्वी अपात्र घोषित करण्यात आलं. या निर्णायाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले.

पॅरिसहून रिकाम्या हातानं परतलेल्या विनेशनं कुस्तीला अलविदा करत राजकारणात प्रवेश केला. ती सध्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची उमेदवार आहे.  कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं विनेशवर गंभीर आरोप केला आहे. विनेशनं देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यानं केली आहे. विशेष म्हणजे योगेश्वर दत्तही आता विनेशप्रमाणे राजकारणात उतरला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावणाऱ्या योगेश्वरनं 'आज तक' शी बोलताना विनेशच्या कृतीवर जोरदार टीका केली. विनेशची स्वत:चे प्राधान्यक्रम असू शकतात. पण, गेल्या वर्षभरात जे घडलं ते देशाला समजलं पाहिजे. देशाच्या नव्या संसदेचं उद्घाटन होत होतं, त्यावेळी देशाची प्रतिमा डागळण्याचं काम विनेशनं केलेल्या आंदोलनानं केलं, असा दावा योगेश्वरनं केला.  

पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र झाल्याबद्दल विनेशनं संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी योगेश्वरनं केली आहे. 'विनेशनं चूक केली. पण, त्याला तिनं कारस्थानाचं रुप दिलं. अगदी देशाच्या पंतप्रधानांनाही दोष दिला. अगदी एक ग्रॅम वजन जास्त असेल तरीही ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित केलं जातं, हे सर्वांना माहिती आहे,' असं योगेश्वरनं म्हणाला. 

( नक्की वाचा : ओम फट स्वाहा ! रोहित शर्मानं भर मैदानात चालवलं डोकं... बांगलादेशवर दिसला परिणाम, Video )
 

'विनेशनं देशात चुकीचं वातावरण तयार केलं. ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्यानंतरही तिच्याबाबत काहीतरी चुकीचं घडलंय असं चित्र उभं केलं. मी जरी तिच्या जागी असतो तर या मी देशाची माफी मागितली असती,' असं योगेश्वरनं यावेळी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
ओम फट स्वाहा ! रोहित शर्मानं भर मैदानात चालवलं डोकं... बांगलादेशवर दिसला परिणाम, Video
'विनेश फोगाटनं कट रचला, देशाची माफी मागावी', ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडूचा गंभीर आरोप
irani-cup-2024-squads-announced-ajinkya-rahane-leads-mumbai-ruturaj-gaikwad-captains-rest-of-india
Next Article
Irani Cup 2024 : अजिंक्यच्या मुंबईला चॅलेंज देण्यासाठी BCCI नं निवडला मराठी कॅप्टन!