पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांवर भारताला समाधान मानावं लागलं आहे. पीव्ही सिंधू, चिराग-सात्विक यांची जोडी, मीराबाई चानू तसेच कुस्तीपटूंकडून भारताला पदकांची आशा होती. मात्र या सर्वांना पॅरिसहून रिकाम्या हातानेच परतावं लागलं आहे.
मात्र यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहणाऱ्या भारतीय खेळाडूंची संख्या देखील मोठी आहे. अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, मात्र केवळ एका स्थानामुळे पदकापासून दूर राहिले. कोण-कोणते खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले यावर एक नजर टाकुया.
मनू भाकर (25 मीटर पिस्टल)
मनू भाकर 25 मीटर पिस्टल स्पर्धेत तिसरं पदक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकावू शकत होती. मात्र तसं झालं नाही. या स्पर्धेत मनूला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मनू भाकरलं एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला आहे.
अंकिता भगत आणि धीरज बोम्मादेवरा (तिरंदाजी)
अंकिता भगत आणि धीरज बोम्मादेवरा ही जोडी मिश्र तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदकाच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र अमेरिकेच्या जोडीने त्यांचा 6-4 असा पराभव केला. या पराभवानंतरही तिरंदाजीत भारताने इतिहास रचला. भारत पहिल्यांच तिरंदाजी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचला.
लक्ष्य सेन (बॅडमिंटन)
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला कांस्य पदकाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. लक्ष्यने हे पदक जिंकलं असतं तर त्याने इतिहास रचला असता. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटमध्ये पदक जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला असता. मात्र सेमीफायनल गाठणारा देखील लक्ष्य पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
अर्जून बाबुता (10 मीटर एअर रायफल)
पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत अर्जुन बाबुताचे पदक थोडक्यात हुकले. शेवटच्या क्षणांमध्ये अर्जून पिछाडीवर पडला आणि त्याने चौथ्या स्थानावर पॅरिस ऑलिम्पिकचा प्रवास संपवला.
माहेश्वरी चौहान आणि अनंतजितसिंग नारुका (नेमबाजी स्कीट शूटिंग)
महेश्वरी चौहान आणि अनंतजितसिंग नारुका यांनाही स्कीट शूटिंगमध्ये 1 स्थानावरून पदक जिंकता आले नाही. माहेश्वरी चौहान आणि अनंतजितसिंग नारुका या जोडीचे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकही हुकले. चीनच्या जियांग यितिंग आणि ल्यु जियानलिन या जोडीने भारतीय जोडीचा कांस्य पदक सामन्यात पराभव केला.
मीराबाई चानूही (वेटलिफ्टिंग)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेती भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात पदक जिंकता आले नाही. एकूण 199 किलो वजन उचलून ती चौथ्या स्थानावर राहिली. कांस्यपदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टरने 200 किलो वजन उचलले. अशारीतीने केवळ ती 1 किलोच्या फरकाने तिचं पदक हुकलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world