जाहिरात

Haryana Politics : विनेश फोगाट आता राजकारण गाजवणार? काँग्रेसचा काय आहे प्लान?

आगामी काळात विनेश राजकारणात सक्रीय सहभाग नोंदविणार असल्याची माहिती आहे.

Haryana Politics : विनेश फोगाट आता राजकारण गाजवणार? काँग्रेसचा काय आहे प्लान?
नवी दिल्ली:

ऑलिम्पिकमध्ये मेडल न मिळवताही प्रत्येक भारतीयांच्या मनावर राज्य करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट (Wrestler Vinesh Phogat) काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारानंतर विनेशने कुस्तीतून संन्यास जाहीर केला. आगामी काळात ती राजकारणात सक्रीय सहभाग नोंदविणार असल्याची माहिती आहे. (Olympics 2024)

आज यावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढल्यामुळे ती खेळ खेळू शकली नाही. या प्रकारानंतर विनेश घरी परतली. यावेळी तिच्या समर्थनार्थ एक रॅली काढण्यात आली होती. यादरम्यान काँग्रेस खासदार दीपेंदर हुड्डा तिच्या सोबत होते. याशिवाय भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले की, आम्हाला विनेश फोगाटचा गौरव करायची इच्छा आहे. जर आमच्याकडे हरियाणा राज्यसभेसाठी एकही जागा असती तर विनेश फोगाटला संधी दिली असती. त्यामुळे हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाट काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याबाबत आज निर्णय जाहीर केला जाणार आहे. तब्बल 30 नावांवर निर्णय घेण्यात आला आहे. 

 नक्की वाचा - 'जग तुझ्यावर थुंकेल', कपिल देवबद्दल काय म्हणाले युवराजचे वडील?

आपसोबत युती?
सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान राहुल गांधी काही सवाल उपस्थित केले. आम आदमी पक्षासोबत निवडणूक लढवल्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार की नाही यावरही चर्चा केली जाणार आहे. अजम माकन यांच्या स्क्रीनिंग कमिटीने 49 जागांची यादी तयार केली आहे. यातील तीस जागांवर निर्णय झाला आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
VIDEO : घाणेरडी शेरेबाजी करणं तरुणाला महागात पडलं, विद्यार्थिनीने सळो की पळो केलं
Haryana Politics : विनेश फोगाट आता राजकारण गाजवणार? काँग्रेसचा काय आहे प्लान?
Chhattisgarh 9 Naxalites killed in encounter with security forces in dantewada
Next Article
छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यामध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार