Pm Narendra Modi And Harleen Deol Viral Video : भारतीय क्रिकेट महिला संघाने 2 नोव्हेंबरला झालेल्या फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून वर्ल्डकपचा किताब जिंकला. त्यानंतर संपूर्ण भारतात टीम इंडियासाठी विजयी जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व महिला खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी मोदींनी भारतीय संघातील महिला खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली आणि वर्ल्ड चॅम्पियन्सला भरभरून शुभेच्छा दिल्या.
याचदरम्यान, महिला खेळाडूंनी पीएम नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान अनेक प्रश्न विचारले. पण टीम इंडियाची स्टार खेळाडू हरलीन देओलने विचारलेल्या प्रश्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. तुमच्या त्वचेवर असणाऱ्या ग्लो चं सीक्रेट काय आहे?, हरलीन म्हणाली, तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे सर..मला तुमच्या स्कीन रुटीनबद्दल विचारायचं आहे. हरलीनने असा प्रश्न विचारताच हॉलमध्ये एकच हशा पिकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
हरलीनच्या प्रश्नाचं उत्तर देत मोदी म्हणाले, माझं या विषयावर जास्त लक्ष नव्हतं. तेव्हा हरलीनच्या बाजूला बसलेल्या स्नेहा राणाने म्हटलं की, देशातील कोट्यावधी नागरिक तुमच्यावर प्रेम करतात. मोदींनी म्हटलं की, हे तर खरंच आहे..समाजाकडून एवढं प्रेम मिळतं. सरकारमध्येही 25 वर्ष झाले आहेत. हेड ऑफ गव्हर्नमेंट बनून खूप दिवस झाले आहेत. जेव्हा लोक आशीर्वाद देतात, तेव्हा त्यांचं एक प्रभाव असतं. दरम्यान, मोदींनी टीम इंडियाच्या महिला खेळाडूंसोबत बुधवारी संवाद साधला होता. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
"आपकी स्किन इतना ग्लो कैसे करती है..." महिला बल्लेबाज हरलीन देओल के सवाल पर पीएम मोदी ने खोला राज#HarleenKaur #PMModi #WorldCupChampions pic.twitter.com/NzBWufzb4s
— NDTV India (@ndtvindia) November 6, 2025
नक्की वाचा >> निवडणुकीपूर्वीच खळबळ! "तुझ्या बायकोचं नाव घेऊ सांगतो, मी तिकीट..", रावसाहेब दानवेंची ऑडिओ क्लिप व्हायरल!
पीएम मोदींनी हरलीनला विचारले प्रश्न
मोदींनी यावेळी उपस्थितांना विचारलं की, कोणीतरी हसणारा असेल ना? यावर खेळाडूंनी जेमिमाचा नाव घेतला. तेव्हा जेमिमाने म्हटलं की, हरलीनही टीमच्या युनिटीबाबत मदत करते. तेव्हा हरलीनने म्हटलं की, टीममध्ये असं कोणीच नाही पाहिजे, ज्यांच्याकडून टीमचं माहौल खराब होईल. ती सर्वांना भेटते आणि काही ना काही करतच राहते. तेव्हा मोदींनी विचारलं इथे आल्यावर काय केलं? तेव्हा सर्वच हसले. या लोकांनी माझी खूप खिल्ली उडवली, असंही हरलीनने म्हटलं.
नक्की वाचा >> Video: पप्पा..जिंकलो! वडिलांना पाहताच हरमनप्रीत-जेमिमानं मैदानात जे केलं..अमोल मुझुमदारसह सर्वच झाले थक्क
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world