'आम्ही फटाके आणले होते पण...' Rinku Singh च्या वडिलांनी मोकळं केलं मन

Rinku Singh : 89 सरासरी आणि 176.23 स्ट्राईक रेट असूनही वर्ल्ड कप टीममध्ये रिंकू सिंहची निवड झालेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rinku Singh : टीम इंडियात निवड न झाल्यानं रिंकू सिंह निराश झाला आहे. (फोटो AFP)
मुंबई:

T20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टीममध्ये रिंकू सिंहचा (Rinku Singh) समावेश करण्यात आलेला नाही. रिंकूची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. आयपीएलपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय टी20 सीरिजमध्ये रिंकूनं दमदार कामगिरी केली होती. त्यानं फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केलं होतं. त्यानंतरही निवड समितीनं 15 जणांच्या मुख्य टीममध्ये त्याला संधी दिलेली नाही. हे क्रिकेट फॅन्स, माजी खेळाडूांसाठी धक्कादायक होतं. रिंकूच्या घरच्यांनाही या बातमीचा मोठा धक्का बसलाय. त्याचे वडील खानचंद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांची निराशा व्यक्त केलीय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'रिंकूची निवड होईल, याची सर्वांनाच खात्री होती. त्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी आम्ही फटाके देखील आणले होते. ते आता तशीच राहणार,' असं रिंकूनं सांगितलं. स्वत: रिंकू सिंहला याबाबत काय वाटलं? याची माहितीही खानचंद यांनी दिलीय. 

'मला वाईट वाटतंय पण मी माझ्या सहकाऱ्यांसाठी आनंदी आहे. मी अंतिम 11 किंवा 15 मध्ये नाही. तर राखीव म्हणून वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये वर्ल्ड कपसाठी जात आहे,' असं रिंकूनं त्याच्या आईला फोनवर सांगितलं, असं खानचंद यावेळी म्हणाले.

( नक्की वाचा : टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये मोठा पक्षपात, निवड समितीचे माजी अध्यक्ष संतापले )

89 सरासरी 176.23 स्ट्राईक रेट पण...

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळणाऱ्या रिंकू सिंहनं टीम इंडियाकडून जबरदस्त कामगिरी केली आहे.

रिंकूनं आत्तापर्यंत 15 टी20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 89 च्या सरासरीनं 356 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 176.23 इतका आहे. 

T20 क्रिकेटमधील आव्हानात्मक असं फिनिशरचं काम रिंकूनं यशस्वीपणे केलंय. त्यामुळे त्याची भारतीय टीममधील निवड नक्की मानली जात होती. पण, निवड समितीनं रिंकूचा मुख्य टीममध्ये नाही तर राखीव म्हणून समावेश केलाय. 

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, (व्हाईस कॅप्टन), शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू :  शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
 

Topics mentioned in this article