जाहिरात
Story ProgressBack

टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये मोठा पक्षपात, निवड समितीचे माजी अध्यक्ष संतापले

T20 World Cup 2024 : निवड समितीच्या माजी अध्यक्षांनीच वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीम इंडियावर नाराजी व्यक्त केलीय.

Read Time: 2 min
टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये मोठा पक्षपात, निवड समितीचे माजी अध्यक्ष संतापले
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कप होणार आहे. (फोटो : BCCI)
मुंबई:

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा झालीय. टीम जाहीर होताच त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केलीय. 2011 साली वर्ल्ड कप विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय टीमची निवड श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील समितीनंच केली होती. त्यानंतरच्या 13 वर्षांमध्ये भारतीय टीमला फक्त एका आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेलं आहे. श्रीकांत यांनी टीम मॅनेजमेंट पक्षपाती असल्याचा आरोप केलाय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नाराजीचं कारण काय?

टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या टीममध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतूराज गायकवाडचा समावेश न केल्यानं श्रीकांत संतापले आहेत. ऋतुराज या आयपीएलमध्ये सातत्यानं रन्स करतोय. त्यानंतरही त्याची वर्ल्ड कपसाठी निवड झालेली नाही. त्यामुळे श्रीकांत नाराज आहेत. शुभमन गिलचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी टीम मॅनेजमेंटवर पक्षपाती असल्याचा आरोप केलाय. गिल कोणत्याही प्रकारात चांगला खेळत नसतानाही त्याला संधी मिळत होती, असं श्रीकांत यांनी म्हंटलंय. 

( नक्की वाचा : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, रोहितसह 'हे' 15 करणार स्वप्नपूर्ती )
 

श्रीकांतनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं, 'शुभमन गिल पूर्णपणे आऊट ऑफ फॉर्म आहे. तरीही त्याची टीममध्ये का निवड केलीय? ऋतुराज गायकवाड दावेदार आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यानं 17 इनिंगमध्ये 500 पेक्षा जास्त रन काढले आहेत. त्याचबरोबर त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकही झळकावलंय.

शुभमन गिल निवड समितीचा आवडता खेळाडू आहे. तो फेल गेला तरी त्याला संधी मिळते. टेस्ट, वन-डे आणि टी20 मध्ये अयशस्वी होऊनही त्याला जागा मिळाली आहे. निवडीमध्ये मोठा पक्षपात आहे.'

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड या सिझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्यानं 10 मॅचमध्ये 63.63 च्या सरासरीनं आणि 146.68 च्या स्ट्राईक रेटनं 509 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. गायकवाड ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. तर गिलनं या सिझनमध्ये साधारण कामगिरी केलीय. त्यानं 10 मॅचमध्ये 35.56 च्या सरासरीनं 320 रन केले आहे. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 140.96 असून त्यानं दोन अर्धशतक झळकावले आहेत. 

( नक्की वाचा : T20 वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगलं, KL राहुलसह 5 जणांची निराशा )
 

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, (व्हाईस कॅप्टन), शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू :  शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination