IPL 2025 आधी होणार मोठा उलटफेर; ऋषभ पंत 'दिल्ली'ची साथ सोडणार, दिग्गज खेळाडूची घेणार जागा

IPL 2025 : ऋषभ पंतच्या आयपीएल करिअरबाबत बोलायचं तर आतापर्यंतचं त्याचं प्रदर्शन शानदार राहिलं आहे. मागील सीजनमध्ये त्याने कमबॅक केलं होतं.

Advertisement
Read Time: 2 mins

आयपीएल 2025 च्या आधी मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतात. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संघाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. ऋषभ पंतने दिल्लीची साथ सोडली तर संघासोबत कोणता खेळाडू जोडला जाणार याची आता चर्चा सुरु झाली आहे. याबाबतही माहिती समोर येत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऋषभ पंत पुढच्या सीजनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना दिसू शकतो. महेंद्रसिंह धोन आयपीएल 2025 नंतर निवृत्ती घेऊ शकतो, असे अंदाज वर्तवले जात आहेत. अशात फ्रेन्चायजीला धोनीच्या जागी त्याच्या तोडीस तोड खेळाडूची कर्णधार म्हणून गरज आहे. त्यासाठी फ्रेन्जायजीकडून ऋषभ पंतच्या नावाचा विचार केला जात आहे. 

नक्की वाचा- द्रविडचा आवडता असल्यानं शुबमन गिल कॅप्टन झाला? टीम इंडियाच्या खेळाडूनं केला खुलासा

ऋषभ पंतच्या आयपीएल करिअरबाबत बोलायचं तर आतापर्यंतचं त्याचं प्रदर्शन शानदार राहिलं आहे. मागील सीजनमध्ये त्याने कमबॅक केलं होतं. दिल्लीकडून खेळताना त्याने 2024 मध्ये 13 सामने खेळले होते. यामध्ये त्याने 40.54 च्या सरासरीने 446 धावा केल्या होत्या. 

ऋषभ पंतची आयपीएल कारकीर्द

ऋषभ पंतने आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 110 डावांमध्ये त्याने 3284 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये 128 ही ऋषभची सर्वोच्च धावसंख्या आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : द्रविडनं विजेतेपद मिळवून दिलं, नवा हेड कोच गंभीरसमोर आहेत 5 मोठी आव्हानं )

ऋषभ पंत धोनीचा फॅन असल्याचं अनेकदा त्यांना सांगितलं आहे. धोनीला तो आपला आदर्श मानतो. त्यामुळे धोनीच्या सल्ल्यानुसार चेन्नई सुपरकिंग्स फ्रॅन्जायजीकडून ऋषभ पंतच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.