T20 World Cup : रोहित आणि आगरकरच्या मनाविरुद्ध झाली हार्दिक पांड्याची निवड!

T20 World Cup 2024 : हार्दिक पांड्याच्या निवडीवर सुरु असलेला वाद अजूनही कायम आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
H
मुंबई:

Rohit Sharma vs Hardik Pandya:  आयपीएल स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आयपीएलनंतर टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियानं 2013 नंतर एकदाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं नाही. वन-डे वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार कामगिरीनंतरही फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. आगामी वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय टीमची घोषणा करण्यात आलीय. या टीमच्या निवडीबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट झालाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा हार्दिक पांड्याच्या निवडीला विरोध होता, असा गौप्यस्फोट 'दैनिक जागरण'मधील रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हार्दिकची निवड 'दबावा' मध्ये करण्यात आल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. त्याचबरोबर आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा टी20 फॉर्मेटला अलविदा करेल, असा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. 

रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या टी20 टीमचा कॅप्टन होईल, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. हार्दिक पांड्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या आयपीएलपूर्वी रोहितला हटवून हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करण्यात आलं. त्याच्या निवडीवर मुंबई इंडियन्सचे फॅन्स चांगलेच नाराज होते. त्यांनी हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं.

( नक्की वाचा : हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर आगरकरनं एकाच वाक्यात दिलं उत्तर )

रोहित शर्माचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यामध्ये रोहित मुंबई इंडियन्सचा असिस्टंट कोच अभिषेक नायरशी चर्चा करत होता. रोहित मुंबई इंडियन्समधील वातावरणाबाबत बोलत होता, असं या व्हिडिओमधून वाटत होतं. हार्दिक आणि रोहितमध्ये सारं काही ठीक नसल्याचा दावा दैनिक जागरणच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.

Advertisement

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध आहे. त्यानंतर 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध भारताची लढत होणार आहे. भारताच्या ग्रुपमध्ये अमेरिका आणि कॅनडा या अन्य दोन टीम आहेत. आगामी वर्ल्ड कपसाठी भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी 24 मे रोजी रवाना होणार आहे. आयपीएल 'प्ले ऑफ' साठी पात्र न झालेले खेळाडू पहिल्या तुकडीत रवाना होतील.

( नक्की वाचा : रोहित, बुमराह, सूर्यानं केली हार्दिक पांड्याची तक्रार? टीम बाहेर पडताच नाराजी उघड )

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, (व्हाईस कॅप्टन), शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह

Advertisement

राखीव खेळाडू :  शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान