जाहिरात
Story ProgressBack

रोहित, बुमराह, सूर्यानं केली हार्दिक पांड्याची तक्रार? टीम बाहेर पडताच नाराजी उघड

IPL 2024 Question on Hardik Pandya Style of captaincy: मुंबई इंडियन्सच्या सिनिअर खेळाडूंनी हार्दिकच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केल्याचं वृत्त आहे.

Read Time: 2 mins
रोहित, बुमराह, सूर्यानं केली हार्दिक पांड्याची तक्रार? टीम बाहेर पडताच नाराजी उघड
IPL 2024 : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादवनं हार्दिक पांड्याच्या कॅप्टनसीवर उपस्थित केला प्रश्न? (फोटो BCCI)
मुंबई:

Question on Hardik Pandya Style of captaincy: सनरायझर्स हैदराबादनं लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केल्यानं मुंबई इंडियन्सचं आयपीएल 2024 मधील आव्हान संपुष्टात आलंय. दिग्गज खेळाडूंचा समावेश असूनही मुंबईची कामगिरी निराशाजनक झालीय. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं होतं. या निर्णयाचे फॅन्समध्ये जोरदार पडसाद उमटले.  मुंबईच्या मैदानातील कामगिरीनं या निर्णयावर प्रश्न उपस्थित झालाय. मुंबई इंडियन्सनं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 12 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये फक्त 4 मॅचमध्ये त्यांना विजय मिळालाय. हार्दिक पांड्याच्या कार्यशैलीवर सिनिअर खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत, असा दावा एका वृत्तामध्ये करण्यात आला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'इंडियन एक्स्प्रेस'च्या रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्सच्या सिनिअर खेळाडूंनी टीमच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या रिपोर्टनुसार, टीममधील प्रमुख खेळाडूंनी कोचिंग स्टाफकडं त्यांची नाराजी व्यक्त केलीय. मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्यानं हे नेतृत्त्वावरील संकट नसल्याचं स्पष्ट केलंय. 'नेतृत्व परिवर्तनाच्या स्थित्यंतरातून जात असलेल्या प्रत्येक टीममध्ये या प्रकारच्या अडचणी येतात. हे खेळात नेहमी घडलं आहे,' असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडू आणि कोचिंग स्टाफ यांची मॅच संपल्यानंतर बैठक झाली. या बैठकीत मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह उपस्थित होते. त्यांनी टीमच्या खराब कामगिरीबाबत त्यांचं मत मांडलं. काही सिनिअर खेळाडू आणि टीम मॅनेजमेंटमध्येही चर्चा झाल्याचं समजतंय.

( नक्की वाचा : आधी धोनीला कॅप्टनपदावरुन काढलं आता राहुलवर भडकले! कोण आहेत LSG चे मालक संजीव गोयंका? )
 

कॅप्टन बदलणार?

हार्दिकनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर त्या मॅचमध्ये सर्वात जास्त रन काढणाऱ्या तिलक वर्मावर प्रश्न उपस्थित केला होता. 'अक्षर पटेल डावखुऱ्या फलंदाजाला (तिलक वर्मा) बॉलिंग करत होता. त्यावेळी त्याला टार्गेट करणं हा चांगला मार्ग ठरला असता. खेळाबद्दल थोडी सजगता दाखवली पाहिजे, असं मला वाटतं. त्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्हाला सामना गमवावा लागला.' असं मत हार्दिकनं व्यक्त केलं होतं.

या रिपोर्टनुसार टीमच्या अपयशासाठी एका खेळाडूला दोषी ठरवणं ड्रेसिंग रुममध्ये रुचलं नाही. 'फ्रँचायझीकडून दरवर्षी प्रमाणे या सिझनचा आढावा घेतला जाईल. टीमच्या आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येतील,' अशी माहिती मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
आधी धोनीला कॅप्टनपदावरुन काढलं आता राहुलवर भडकले! कोण आहेत LSG चे मालक संजीव गोयंका?
रोहित, बुमराह, सूर्यानं केली हार्दिक पांड्याची तक्रार? टीम बाहेर पडताच नाराजी उघड
Rahul Dravid tenure is only up to June will soon release an advertisement for new Team India head coach says BCCI secretary Jay Shah
Next Article
T20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाला मिळणार नवा कोच? जय शहानं दिलं महत्त्वाचं अपडेट
;