जाहिरात
Story ProgressBack

हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर आगरकरनं एकाच वाक्यात दिलं उत्तर

Ajit Agarkar on Hardik Pandya : हार्दिक पांड्याला व्हाईस कॅप्टन का केलं? असा प्रश्न विचारण्यात येत होता.

हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर आगरकरनं एकाच वाक्यात दिलं उत्तर
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याची कामगिरी साधारण आहे.
मुंबई:

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. टीम जाहीर होऊन 48 तास उलटल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी टीम निवडीबाबतच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जून महिन्यात होणाऱ्या या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा रोहित शर्मा कॅप्टन तर हार्दिक पांड्या व्हाईस कॅप्टन आहे. 

सध्याच्या आयपीएल सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिकला प्रभाव टाकता आलेला नाही. त्याला फॅन्सकडून सातत्यानं ट्रोल करण्यात येतंय. त्यानंतरही निवड समितीनं त्याची व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती का केली? असा प्रश्न क्रिकेट फॅन्स विचारत होते. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी या प्रश्नाला उत्तर दिलंय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले आगरकर?

'व्हाईस कॅप्टनच्या मुद्यावर चर्चा झाली नाही. तो (हार्दिक पांड्या) फिट असेल तर जे काही करु शकतो त्याला कोणताही पर्याय नाही, असं निवड समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं. 'व्हाईस कॅप्टनपदासाठी तसंच क्रिकेट हार्दिक पांड्याच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्याला रिप्लेस करणे अवघड आहे. तो कॅप्टनला अनेक ऑप्शन देऊ शकतो. तो मोठ्या ब्रेकनंतर नुकताच परतलाय, असं आगरकर यांनी स्पष्ट केलं.

( नक्की वाचा : टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये मोठा पक्षपात, निवड समितीचे माजी अध्यक्ष संतापले )
 

कशी आहे हार्दिकची कामगिरी?

हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे वन-डे वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तो थेट आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून खेळतोय.  हार्दिकनं आत्तापर्यंत 10 मॅचमध्ये 21.88 च्या सरासरीनं 131 रन केले आहेत. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. तर, त्याला फक्त 6 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकोनॉमी रेट तब्बल 11 आहे. 

( नक्की वाचा : 'आम्ही फटाके आणले होते पण...' Rinku Singh च्या वडिलांनी मोकळं केलं मन )
 

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, (व्हाईस कॅप्टन), शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू :  शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
'आम्ही फटाके आणले होते पण...' Rinku Singh च्या वडिलांनी मोकळं केलं मन
हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर आगरकरनं एकाच वाक्यात दिलं उत्तर
T20 World Cup 2024 indian stars flop show in ipl after team india announcement
Next Article
T20 वर्ल्ड कपमध्ये निवड होताच घसरला खेळ, रोहित ते अर्शदीप सारे फेल
;