भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या चाहत्यांसाठी सोमवारचा दिवस थोडा आश्चर्याचा आणि चिंतेचा ठरला. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य पद्म पुरस्कार सोहळ्यात रोहित शर्मा उपस्थित राहू शकला नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच रोहितला देशातील चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी म्हणजेच 'पद्मश्री' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. त्यामुळे तो या सोहळ्याला का आला नाही, यावरून चर्चांना उधाण आले आहे.
पुरस्कार हुकला नाही
रोहित शर्मा या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नसला, तरी तो या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून मुकलेला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कार सोहळे सहसा अनेक टप्प्यांमध्ये आयोजित केले जातात. पुरस्कार विजेत्यांचे वेळापत्रक, त्यांचे क्रिकेटमधील दौरे आणि सरकारी नियोजनानुसार वेगवेगळ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातात.
(नक्की वाचा- Virat vs Head: कोहलीसोबतच्या वादानंतर हेडच्या पत्नीसोबत नको ते घडलं; जेसिका हेडने व्यक्त केली नाराजी)
दुसऱ्या टप्प्यात मिळणार बहुमान
रोहित शर्मा पहिल्या टप्प्यातील सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्यामुळे त्याला आता आगामी दुसऱ्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाईल, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी
रोहित शर्माने भारतीय क्रिकेटला दिलेल्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेऊनच त्याला या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. रोहितच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक पातळीवर तिरंगा फडकवला आहे. रोहितच्या कप्तानीखाली भारताने 2024 मध्ये टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
रोहितशिवाय 'या' दिग्गज खेळाडूंचाही बहुमान
या भव्य सोहळ्यात केवळ रोहित शर्माच नाही, तर क्रीडा क्षेत्रातील इतरही अनेकांचा 'पद्मश्री' देऊन गौरव करण्यात आला आहे. यामध्ये हरमनप्रीत कौर, भारतीय महिला हॉकीपटू सवित पुणिया, पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार या खेळाडूंचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world