RCB Captains : 18 वर्षात दिग्गजांना जमलं नाही ते पाटीदारने करुन दाखवलं; RCB चे आतापर्यंतचे 8 कर्णधार

RCB Captains List : अनेक दिग्गजांना नेतृत्व केलेल्या या संघाला आयपीएल ट्रॉफीसाठी 18 वर्षांची वाट पाहावी लागली. अखेर रजत पाटीदारच्या नेतृत्त्वातच आरसीबीने इतिहास रचत आयपीएल जेतेपद पटकावलं. मात्र

जाहिरात
Read Time: 3 mins

IPL 2025 : 18 हुलकावणी दिलेल्या आयपीएल जेतेपदावर अखरे रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरने नाव कोरलं आहे. याआधी तीन वेळा फायनल खेळलेल्या आरसीबीच्या पदरी निराशाच पडली. अनेक दिग्गजांना नेतृत्व केलेल्या या संघाला आयपीएल ट्रॉफीसाठी 18 वर्षांची वाट पाहावी लागली. अखेर रजत पाटीदारच्या नेतृत्त्वातच आरसीबीने इतिहास रचत आयपीएल जेतेपद पटकावलं. मात्र याआधी रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरचं नेतृ्त्व कुणी केलं यावर एक नजर टाकुया. 

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रजत पाटीदार : रजत पाटीदार आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व करताना दिसला. तो फ्रँचायझीचा आठवा कर्णधार आहे. पहिल्याच्या सीजनमध्ये त्याने आरसीबीला चॅम्पियन बनवण्याचा कारनामा केला आहे. 

राहुल द्रविड : माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविड हा आयपीएलमध्ये आरसीबीचा पहिला कर्णधार होता. 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात त्याने आरसीबीची सूत्रे हाती घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली, फ्रँचायझीने 14 सामने खेळले आणि फक्त चार सामने जिंकले.

(नक्की वाचा-  IPL 2025 : वैभव सूर्यवंशी ठरला 'सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन', TATA Curvv कार मिळाली, पण 4 वर्ष चालवू शकणार नाही)

Advertisement

केविन पीटरसन : इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने 2009 च्या आयपीएलमध्ये 6 सामन्यांमध्ये आरसीबीची सूत्रे हाती घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली फ्रँचायझीने दोन सामने जिंकले आणि चार सामने गमावले.

अनिल कुंबळे : 2009 च्या हंगामाच्या मध्यात पीटरसनच्या जागी माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2010 मध्येही त्याने संघाचे नेतृत्वही केले. कुंबळेच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 35 पैकी 19 सामने जिंकले आणि 16 सामने गमावले.

Advertisement

डॅनियल व्हेटोरी : न्यूझीलंडचा माजी फिरकी गोलंदाज डॅनियल व्हेटोरीने 2011 आणि 2012 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने 28 सामने खेळले. या काळात आरसीबीने 15 सामने जिंकले आणि 13 सामने गमावले.

( नक्की वाचा : IPL 2025 Final : आयपीएल फायनलमध्ये विराट कोहलीनं केला मोठा रेकॉर्ड, एक फोर लगावत रचला इतिहास!)

विराट कोहली : 2013 च्या आयपीएलमध्ये विराट कोहलीला आरसीबीचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. 2021 पर्यंत त्याने सूत्रे सांभाळली. 50 हून अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा तो आरसीबीचा एकमेव कर्णधार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 143 सामने खेळले आणि त्यापैकी 66 जिंकले तर 80 सामने गमावले.

Advertisement

शेन वॉटसन : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसननेही आरसीबीची धुरा सांभाळली आहे. त्याने 2017 मध्ये तीन सामन्यांमध्ये बंगळुरू संघाचे नेतृत्व केले होते. ज्यामध्ये एक विजय आणि दोन पराभव झाले होते. कोहली दुखापतीमुळे त्या हंगामात तीन सामन्यांमध्ये खेळला नव्हता, ज्यामुळे वॉटफाफ डू प्लेसिस:सनला कर्णधार बनवण्यात आले.

कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज फाफ डू प्लेसिसकडे आरसीबीचं नेतृत्व आलं. तो आयपीएल 2024 पर्यंत फ्रँचायझीचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने तीन हंगामात 42 सामने खेळले. यातील 21 सामने जिंकले आणि 21 सामने गमावले.

Topics mentioned in this article