
IPL 2025 : आयपीएलचा 18 वा सीजन 3 जून रोजी संपुष्टात आला. रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरने 18 वर्षांनी जेतेपदावर नाव कोरलं. विराट कोहलीसाठी हा सीजन खूप खास ठरला. मात्र यंदाचा सीजन काही तरुण अनकॅप्ड खेळाडूंनी गाजवला. यापैकी एक म्हणजे राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी आहे. वैभव सूर्यवंशीला सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासोबतच त्याला टाटा कर्व्ह कारही बक्षीस म्हणून मिळाली.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैभव सूर्यवंशीचा पहिला हंगाम उत्तम होता. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने अनेक वादळी खेळी केल्या. वैभवने गुजरात टायटन्सविरुद्ध 38 चेंडूत 101 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 11 षटकार आणि 7 चौकार ठोकले. वैभव आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडूही ठरला. त्याने युसूफ पठाणचा विक्रम मोडून काढला.
आयपीएलच्या त्याच्या पहिल्या हंगामात वैभवने एकूण सात सामने खेळले. यामध्ये त्याने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या. या दरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आला. यासोबत त्याला टाटा कर्व्ह कार बक्षिस म्हणून देण्यात आली.
( नक्की वाचा : IPL 2025 Final : आयपीएल फायनलमध्ये विराट कोहलीनं केला मोठा रेकॉर्ड, एक फोर लगावत रचला इतिहास!)
वैभवने मोठ्या दिमाखात गाडीची चावी स्वीकारली खरी, मात्र ही गाडी तो चालवू शकणार नाही. याचं कारण म्हणजे वैभव गाडी चालवू शकेल अजून एवढा मोठा नाही. कारण तो फक्त 14 वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी 18 वर्ष पूर्ण लागतं. त्यामुळे वैभवला आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच बक्षिस म्हणून मिळालेली कार चालवण्यासाठी अजून चार् वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
(नक्की वाचा- IPL 2025 Prize Money: चॅम्पियन RCBवर पैशांचा पाऊस, 'पंजाब'ही मालामाल! कुणाला किती कोटी? जाणून घ्या)
वैभवची IPL कामगिरी
वैभवने पहिल्याच आयपीएल सामन्यात 20 चेंडूत 34 धावांची खेळी केली होती. या सीजनमध्ये त्याने सात सामन्यांमध्ये 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. या हंगामात सात किंवा त्याहून अधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world