
Shoaib Malik: माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, शोएब त्याची तिसरी पत्नी सना जावेदपासूनही घटस्फोट घेणार आहे. शोएब आणि सना यांनी जानेवारी 2024 मध्ये निकाह केला होता. त्यांच्या लग्नाला अद्याप दोन वर्षही झालेले नाहीत. सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी बायको आहे. यापूर्वी शोएबनं भारताची माजी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतला होता. आता त्याचे तिसरे लग्नही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे
काय आहेत अपडेट?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये शोएब आणि सना यांनी कराची येथे एका खाजगी समारंभात निकाह केला होता. त्यावेळी शोएब यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. शोएब आणि सना लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते आणि रिलेशनशिपमध्ये होते.
एका कार्यक्रमात ते दोघंही वेगवेगळे दिसले. तसंच त्यांच्यात काहीही बोलणं झालं नाही. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. या कार्यक्रमातील एका व्हिडिओमध्ये शोएब ऑटोग्राफ देत असल्याचे दिसत आहेत. सना दुसऱ्या दिशेला होती. या जोडप्यामधील या दुराव्यामुळे दोघांच्या वेगळे होण्याची चर्चा वाढली आहे.
( नक्की वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माला हटवणे कठीण, पण...; 'ती' 3 कारणे देत आगरकरनं फोडलं गुपित )
शोएबच्या माजी पत्नी
शोएब मलिकचे 2002 मध्ये पहिल्यांदा आयेशा सिद्दीकी यांच्याशी लग्न केले होते आणि 2010 मध्ये त्यांचा हा विवाह तुटला. पहिल्या घटस्फोटानंतर त्याने 2010 मध्येच सानिया मिर्झा यांच्याशी निकाह केला होता, ज्याला भारतात खूप विरोध झाला होता.
शोएब आणि सानियाचे नाते 13 वर्षे टिकले आणि 2023 मध्ये या दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सानियापासून घटस्फोट घेतल्यानंतर लगेचच, म्हणजेच 2024 मध्ये शोएब यांच्या आयुष्यात सना जावेद आली. जानेवारी 2024 मध्ये दोघांनी निकाह केला. त्यांच्या निकाहला अजून 2 वर्षही पूर्ण झाले नाहीत. त्यापूर्वीच ते वेगळे होणार असल्याच्या बातम्यांची जोरदार चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world