जाहिरात

'मुंबईकरांना खड्ड्यांची सवय, दरवर्षी बेनिफिट...' सुनील गावस्करांची कॉमेंट्री दरम्यान टोलेबाजी

Sunil Gavaskar on Mumbai Potholes : ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्रीच्या दरम्यान केलेल्या टोलेबाजीची चांगलीच चर्चा सुरु आहे.

'मुंबईकरांना खड्ड्यांची सवय, दरवर्षी बेनिफिट...' सुनील गावस्करांची कॉमेंट्री दरम्यान टोलेबाजी
मुंबई:

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरी टेस्ट सध्या कानपूरमध्ये सुरु आहे. या टेस्टमध्ये पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 35 ओव्हर खेळ झाला. बांगलादेशनं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 107 रन केले. पहिल्या दिवशी पावसाच्या अडथळ्यामुळे काहीशा निरस झालेल्या खेळात महान खेळाडू आणि ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्रीच्या दरम्यान केलेल्या टोलेबाजीची चांगलीच चर्चा सुरु आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबईच्या रस्त्यावर टोलेबाजी

सुनील गावस्करांनी लखनौ टेस्टपूर्वी अयोध्येला गेले होते. अयोध्येमध्ये श्रीरामांच्या जन्मभूमीत बांधण्यात आलेल्या भव्य मंदिराला त्यांनी भेट दिली. रामलल्लांचं दर्शन घेतलं. टीम इंडियाचा माजी विकेटकिपर-बॅटर दिनेश कार्तिक यांनी कॉमेंट्री करत असताना गावस्कर अयोध्येला जाऊन आल्याचं सांगितलं.

गावस्करांनी त्यानंतर कॉमेंट्री करताना लखनौ ते अयोध्या दरम्यानच्या रस्त्याची प्रशंसा केली. हा रस्ता अप्रतिम असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी पुढं बोलत असताना त्यांनी मुंबईतील रस्त्यावर परखड वक्तव्य केलं.

आम्हा मुंबईकरांना खड्ड्यांची सवय आहे. मुंबईत दरवर्षी रस्ते तयार करणाऱ्यांची बेनिफिट मॅच होत असते, असं वाटतं. ते दरवर्षी रस्ते बनवतात आणि दरवर्षी त्या रस्त्यांवर खड्डे असतात,' असं गावस्कर यांनी सांगितलं.

IND vs BAN : भारत-बांगलादेश टेस्टच्या दरम्यान बांगलादेशी फॅनला बेदम मारहाण? हॉस्पिटलमध्ये दाखल

( नक्की वाचा : IND vs BAN : भारत-बांगलादेश टेस्टच्या दरम्यान बांगलादेशी फॅनला बेदम मारहाण? हॉस्पिटलमध्ये दाखल )

रोहित शर्मानं दिला धक्का

दरम्यान, कानपूर टेस्टमध्ये पहिल्या दिवशी सकाळी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर 1964 नंतर पहिल्यांदाच कोणत्या कॅप्टननं टेस्ट मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदाच फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला. कानपूरचं पिच सामान्यत: स्पिनर्सना मदत करतं. पण, मॅचपूर्वी झालेल्या पावसाचा फायदा घेऊन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. गेल्या 9 वर्षात टीम इंडियाच्या कॅप्टननं भारतामध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
IND vs BAN : भारत-बांगलादेश टेस्टच्या दरम्यान बांगलादेशी फॅनला बेदम मारहाण? हॉस्पिटलमध्ये दाखल
'मुंबईकरांना खड्ड्यांची सवय, दरवर्षी बेनिफिट...' सुनील गावस्करांची कॉमेंट्री दरम्यान टोलेबाजी
pakistan-born-australian-cricketer-usman-khawaja-interfaith-marriage-rachel-mclellan-converts-to-islam
Next Article
धर्म परिवर्तन केले, 9 वर्षांनी छोट्या तरुणीशी लग्न केले; ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा झाला इस्लामी पद्धतीने विवाह