जाहिरात

Sunil Gavaskar: विराट-रोहित 2027 चा ODI वर्ल्डकप खेळणार का? गावस्करांचं खळबळजनक विधान, 'हा ऑस्ट्रेलिया दौरा.."

Sunil Gavaskar On Virat Kohli And Rohit Sharma : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत मोठं विधान केलं आहे.

Sunil Gavaskar: विराट-रोहित 2027 चा ODI वर्ल्डकप खेळणार का? गावस्करांचं खळबळजनक विधान, 'हा ऑस्ट्रेलिया दौरा.."
Sunil Gavaskar Latest Statement
मुंबई:

Sunil Gavaskar On Virat Kohli And Rohit Sharma : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत मोठं विधान केलं आहे. भारताचा वनडेचा नवा कर्णधार म्हणून शुबमन गिलची बीसीसीआयने नुकतीच घोषणा केलीय.ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. तर विराट कोहलीही या सीरिजमध्ये खेळणार आहे. दोघांच्या क्रिकेट करिअरबाबत उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. विराट-रोहित 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही? याबाबत सुनील गावस्कर यांनी मोठं विधान केलं आहे.जर हा ऑस्ट्रेलिया दौरा नसता, तर रोहित-कोहली सीरिजमधून बाहेर असते.

सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?

गावस्कर यांनी म्हटलंय की, 2023 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा निसटता पराभव केला होता. या पराभवाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले, मला पूर्ण विश्वास आहे की, जर हा झिम्बाब्वे किंवा वेस्ट इंडिजचा दौरा असता, तर दोघेही या सीरिजसाठी उपलब्ध नसते. पण हा दौरा ऑस्ट्रेलियात आहे. मागच्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताच पराभव केला होता. कदाचित याच कारणामुळे दोघांनी निर्णय घेतला असेल की, आम्हाला ही सीरिज खेळायची आहे. 

नक्की वाचा >> Video : 'अहो..संसार आहे की नाही',72 तासांची शिफ्ट करून रेल्वे कर्मचारी घरी परतला, बायकोनं नवऱ्याची शाळाच घेतली

2027 वर्ल्डकपपर्यंत रोहित 40 वर्षांचा होईल.तर कोहलीचं वय 37 वर्ष होईल. गावस्कर यांनी म्हटलं की, जोपर्यंत हे दोन्ही खेळाडू फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत नाहीत, तोपर्यंत या अनुभवी जोडीसाठी संघात टीकून राहणं कठीण होईल.अगरकर यांनी स्वत:म्हटलं होतं की,प्रत्येक वर्षी खेळल्या जाणाऱ्या वनडे मॅचची संख्या कमी झाली आहे. प्रत्येक खेळाडूला जेव्हाही संधी मिळेल,फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळणं महत्त्वाचं आहे. 

गावस्कर यांनी पुढं म्हटलं की, भारत पुढच्या काही वर्षांमध्ये किती वनडे सामने खळतो, यावर सर्वकाही अवलंबून असेल. वर्ल्डकपसारख्या मोठ्या टूर्नामेंटच्या तयारीसाठी एक सीजनमध्ये फक्त 7 किंवा 8 वनडे सामने खेळणं सोपं नाहीय. त्या 8 सामन्यांसाठी कदाचित 5 टी-20 आणि 3 वनडे सामने होतील. जे खेळाडू त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, त्यांना भारतात विजय हजारे ट्रॉफी खेळावी लागेल.

नक्की वाचा >> डिलिव्हरी बॉयने केलं मोठं कांड! बिल्डिंगमध्ये पार्सल देताना तरुणीच्या छातीला हात लावला अन्..CCTV Video व्हायरल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com