जाहिरात

Vinod Kambli : विनोद कांबळीला मिळणार दरमहा 30,000 रुपये, महान क्रिकेटपटूनं दिला मदतीचा हात

Vinod Kambli : विनोद कांबळीला मिळणार दरमहा 30,000 रुपये, महान क्रिकेटपटूनं दिला मदतीचा हात
मुंबई:

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) गेल्या काही दिवसांपासून खराब प्रकृती आणि बिकट आर्थिक परिस्थिती यामुळे चर्चेत  आहे. सचिन तेंडुलकरचा बालमित्र असलेल्या विनोदनं 104 वन-डे आणि 17 टेस्टमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. विनोदला डिसेंबर महिन्यात ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्याला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. पण, विनोदची आर्थिक परिस्थिती बिकटच आहे.  आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विनोदला टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि महान क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विनोदला माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंट्रेटर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) मदत करणार आहेत. डिसेंबर 2024 मध्ये मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ खास कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात विनोदची अवस्था पाहून गावस्कर यांनी विनोदला मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांनी हा शब्द पाळला असून आता गावस्करांकडून विनोदला दरमहिना मदत मिळणार आहे.  

'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार गावस्कर चॅम्प्स फाऊंडेशनकडून गावस्कर यांना दरमहिना 30,000 रुपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर वार्षिक वैद्यकीय मदतीसाठी देखील 30,000 रुपये दिले जाणार आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात गावस्कर आणि कांबळीची प्रत्यक्ष भेट देखील झाली होती. 

( नक्की वाचा : सचिन, लारा, विराटसह कुणालाही मोडता आला नाही विनोद कांबळीचा हा रेकॉर्ड )
 

कांबळीला घटस्फोट देणार होती पत्नी

दरम्यान विनोद कांबळीला आपण घटस्फोट देणार होतो, असा गौप्यस्फोट त्याची पत्नी अँड्रिया हेविटनं केला होता. 'आपण विनोदपासून घटस्फोट घेणार होतो. 2023 साली घटस्फोटाची केस देखील दाखल केली होती. पण विनोदची असहाय्य अवस्था पाहून आपण हा निर्णय रद्द केला, असं तिनं सांगितलं. मुक्त पत्रकार सुर्यांशी पांडे यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये अँड्रियानं हा खुलासा केला होता. 

अँड्रिया हेविट ही विनोद कांबळीची दुसरी बायको आहे. या दोघांनी 2006 साली एका खासगी कार्यक्रमात सिव्हिल कोर्टमध्ये लग्न केलं होतं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: