जाहिरात
Story ProgressBack

T-20 WC 2024 : पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार? अमेरिकेच्या विजयाने संपूर्ण समीकरण बदललं

यूएसएविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने गुरुवारी प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने देखील 20 ओव्हरमध्ये 159 धावा केल्या.

T-20 WC 2024 : पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार? अमेरिकेच्या विजयाने संपूर्ण समीकरण बदललं

अमेरिकेत सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. यूएसएने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाला आहे.  

दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर अमेरिकेला सुपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी आहे. अमेरिकेने ग्रुप स्टेजमध्ये आधी कॅनडाला हरवलं आहे. त्यानंतर पाकिस्तानचा देखील पराभव केला. अमेरिकेचे आता दोन सामन्यांमध्ये 4 अंक झाले आहेत. अमेरिकाचे पुढील सामने आयर्लंड आणि भारताविरोधात होणार आहेत. अमेरिकेने दोन्ही सामने जिंकले तर ते सुपर 8 साठी पात्र होतील. 

(नक्की वाचा- अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, बाबर आझमनं कुणावर फोडलं खापर?)

अमेरिका-पाकिस्तान सामन्यात काय घडलं?

यूएसएविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने गुरुवारी प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने देखील 20 ओव्हरमध्ये 159 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपरओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने 18 धावा केल्या. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 19 धावांचा आवश्यकता होता. मात्र पाकिस्तानने केवळ 13 धावाच केल्या आणि सामना गमावला. 

सुपर 8 पात्रतेचं गणित 

सध्या अमेरिका आणि भारत हे दोनच संघ 8 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. कारण या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड यांनी प्रत्येकी एक सामना गमावला असून हे तिन्ही संघ 6 गुणांच्या पुढे जाऊ शकत नाहीत. अमेरिकेला अजूनही भारत आणि आयर्लंडविरुद्ध सामने खेळायचे आहेत. त्याने यापैकी एकही सामना जिंकल्यास त्याचे 6 गुण होतील आणि सुपर-8 च्या शर्यतीत ते मजबूत राहतील.

( नक्की वाचा : पाकिस्तानला हरवून USA ने रचला इतिहास, अंगावर काटा आणणारा सुपर ओव्हर )

दुसरीकडे पाकिस्तानने अमेरिकेविरुद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे भारत, आयर्लंड आणि कॅनडा हे तिन्ही सामने पाकिस्तानला जिंकावे लागतील. मात्र वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धचा पाकिस्तानचा रेकॉर्ड पाहिला तर ते सोपं नाही. आयर्लंडमध्येही कधीही सामना फिरवण्याची ताकद आहे. तरीही पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकले आणि भारतानेही तीन सामने जिंकले आणि अमेरिकेनेही आयर्लंडलाही हरवले. तर भारत, अमेरिका आणि पाकिस्तानचे प्रत्येकी 6 गुण होतील. त्यानंतर रनरेटच्या आधारे दोन संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील.ॉ

( नक्की वाचा : अमेरिकेच्या विजयात चमकणारा, कोण आहे सौरभ नेत्रावळकर? )

ग्रुप 'अ' मधील स्पर्धा गुंतागुंतीची बनली आहे. भारताकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तानला सुपर-8 टप्प्यात पोहोचण्याची संधी असेल. तिथे आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. अमेरिका आपले उरलेले दोन्ही सामने हरेल अशी आशा पाकिस्तानला करावी लागेल. तसेच, आयर्लंड एकतर कॅनडाविरुद्ध हरतो किंवा थोड्या फरकाने सामना जिंकला तर पाकिस्तान, अमेरिका आणि आयर्लंडचे प्रत्येकी चार गुण होतील आणि मग नेट रनरेटसाठी पाकिस्तानला मोठा विजय नोंदवण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला सुपर 8 मध्ये पोहोचायचं असेल तर भारत आणि आयर्लंडवर अवलंबून राहावं लागणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला धडा, रोहित शर्माला महाग पडतील 4 चुका
T-20 WC 2024 : पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार? अमेरिकेच्या विजयाने संपूर्ण समीकरण बदललं
usa canada afghanistan bangladesh t20 world cup 2024 indian-connection
Next Article
भारतीय खेळाडूंच्या जोरावर छोट्या संघांची दमदार कामगिरी, 4 मोठे उलटफेर
;