टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. तब्बल 13 वर्षांनी टीम इंडियांने वर्ल्ड कपवर तर 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया चहूबाजूने कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होता आहे. आता बीसीसीआयने देखील भारतीय खेळाडूंना गुड न्यूज दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीसीसीआयने टीम इंडियाला मोठं गिफ्ट दिलं आहे. याआधी कधीही बीसीसीआयने एवढी मोठी रक्कम टीम इंडियाला बक्षिस म्हणून दिली नव्हती. बीसीसीआयने टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
(नक्की वाचा - Rohit Sharma Retirement: विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माची T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा)
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी20 विश्वचषक विजेत्या संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जय शाह यांनी X अकाऊंटवर लिहिले की, "ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 च्या विजेत्या भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संघाने संपूर्ण स्पर्धेत असामन्य प्रतिभा, दृढनिश्चय आणि कौशल्य सादर केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन."
(नक्की वाचा- Video सूर्यानं कॅच घेतला म्हणून भारतानं वर्ल्ड कप जिंकला, पुन्हा, पुन्हा पाहा तो प्रसंग)
आयसीसीकडूनही कोट्यवधी रुपयांचं बक्षिस
आयसीसीकडून वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला 2.45 मिलियन डॉलर म्हणजेच 20.42 कोटी रुपयाचं बक्षिस मिळालं. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाला निम्मी रक्कम मिळाली. दक्षिण आफ्रिका संघाला 1.28 मिलियन डॉलर म्हणजेच 10.67 कोटी रुपये मिळाले आहेत.