IND vs SA Final : 'कठीण समय येता 'विराट' कामास येतो', फायनलमध्ये केली रेकॉर्डची बरोबरी

IND vs SA Final : या संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) फॉर्मात नव्हता. पण, त्यानं फायनल मॅचमध्ये स्वत:चा क्लास दाखवून दिलाय.

Advertisement
Read Time: 2 mins
IND vs SA Final, Virat Kohli (@AFP)
मुंबई:

IND vs SA Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये (India vs South Africa) विराट कोहलीनं (Virat Kohli) हाफ सेंच्युरी झळकावली आहे. या संपूर्ण स्पर्धेत विराट फॉर्मात नव्हता. पण, त्यानं फायनल मॅचमध्ये स्वत:चा क्लास दाखवून दिलाय. 

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा 9 रन काढून आऊट झाला. त्यानंतर ऋषभ पंत पहिल्याच बॉलवर परतला. तर सूर्यकुमार यादवला फक्त 3 रन करता आले. 3 आऊट 34 या बिकट परिस्थितीमधून विराट कोहलीनं अक्षर पटेलच्या मदतीनं भारताची इनिंग सावरली.

विराटची बरोबरी

विराट कोहलीनं हाफ सेंच्युरी झळकावताच एका वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. विराटचं T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधील ही 39 वी हाफ सेंच्युरी आहे. क्रिकेटच्या या प्रकारात सर्वाधिक हाफ सेंच्युरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आलाय. त्यानं पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमची बरोबरी केलीय. 

ट्रेंडींग बातमी - IND vs SA Final : कोण जिंकणार वर्ल्ड कप? 5 लढती करणार निश्चित

विराट कोहली आणि अक्षर पटेलनं चौथ्या विकेटसाठी 54 बॉलमध्ये 72 रनची पार्टनरशिप केली. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षरनं त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. अक्षरनं 31 बॉलमध्ये 47 रन केले. या खेळीत त्यानं 1 फोर आणि 4 सिक्स लगावले.

Advertisement

ट्रेंडिग बातमी - IND vs ENG : भारतीय बॉलरनं घेतली अजब हॅटट्रिक, तुमच्या लक्षात आली का?

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीमनं या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारतानं इंग्लंडचा तर दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा पराभव करुन फायनलमध्ये प्रवेश केलाय. दोन्ही टीमनं फायनलमध्ये कोणताही बदल न करता सेमी फायनलमध्ये विजय मिळवलेली टीम कायम ठेवलीय.