पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला धडा, रोहित शर्माला महाग पडतील 4 चुका

India vs Pakistan T20 WC 2024 : अमेरिकेविरुद्ध पाकिस्ताननं केलेल्या 4 चुकांपासून टीम इंडियानं धडा घेणं आवश्यक आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

India vs Pakistan T20 WC 2024 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या मॅचकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. न्यूयॉर्कमध्ये रविवारी 7 जून रोजी हा सामना खेळला जाणार आहे. सुपर 8 मधील जागा बळकट करण्यासाठी भारतीय टीमला पाकिस्तानचा पराभव करावा लागेल. त्याचबरोबर आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी कोणत्याही टीमला हलकं लेखता येणार नाही, याची रोहित शर्मा आणि कंपनीला जाणीव आहे. अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाल्यानं त्याचं उदाहरण याच स्पर्धेत पाहायला मिळालंय. अमेरिकेविरुद्ध पाकिस्ताननं केलेल्या 4 चुकांपासून टीम इंडियाला धडा घेणं आवश्यक आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पॉवर प्ले

पाकिस्ताननं अमेरिकेविरुद्ध 'पॉवर प्ले' मध्येच 3 विकेट्स गमावल्या. त्यामुळे नंतरच्या ओव्हर्समध्ये त्यांना विकेट्स वाचवण्यावर भर द्यावा लागला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली असती तर त्यांना शेवटच्या ओव्हर्समध्ये मनमोकळी फटकेबाजी करता आली असती, पण असं झालं नाही. पाकिस्तान टीमची ही अवस्था पाहून भारतीय टीम नक्कीच सावध असेल. पॉवर प्लेमध्ये सावध खेळून शेवटच्या ओव्हर्समध्ये पिच सोपं झाल्यावर वेगानं रन्स करण्याचा प्लॅन टीम इंडिया करु शकते. 

6 ओव्हर्समधील बॉलिंग

पहिल्या 6 ओव्हर्समध्ये बॉलर्सना पिचची चांगली मदत मिळतीय. पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी पहिल्या 6 ओव्हर्सचा ठोस प्लॅन करणे आवश्यक आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड पिचचं स्वरुप पाहून तो प्लॅन तयार करतील अशी आशा आहे. 

( नक्की वाचा : अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, बाबर आझमनं कुणावर फोडलं खापर? )
 

सुपर ओव्हर्समधील निवड

पाकिस्तानकडून सुपर ओव्हरमध्ये इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी बॅटिंग केली. टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय देखील पराभवाचं कारण ठरला. पाकिस्तानविरुद्ध तसंच या वर्ल्ड कपमधील पुढील मॅचमध्ये ही परिस्थिती ओढावली तर त्यासाठी खास योजना रोहित शर्माला करावी लागेल.

Advertisement

 वाईड्सचा भडिमार नको

पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरनं सुपर ओव्हर्समध्ये 3 वाईड बॉल टाकले. त्याचा अमेरिकेला मोठा फायदा झाला. त्यांनी सुपर ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 18 रन दिले. आमिरनं वाईड बॉल टाकल्यानंतर अमेरिकेनं पळून काढलेलं रन्स (बाय) देखील रोखले असते तरी अमेरिकेला सुपर ओव्हरमध्ये 11 रनच काढता आले असते. आमिरनं 7 रन्स अतिरिक्त दिले. हे रन्स पाकिस्तानच्या पराभवात निर्णायक ठरले. टीम इंडियाची या स्पर्धेत एखादी मॅट 'टाय' झाली तर पाकिस्ताननं केलेली ही चूक टाळणं देखील आवश्यक आहे.