T20 WC 2024 : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाची बेस्ट 11 कोणती आणि का?

T20 WC 2024 : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाची बेस्ट प्लेईंग 11 कोणती आणि का? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
Read Time: 4 mins
टीम इंडियाची बेस्ट प्लेईंग 11 कोणती?
मुंबई:

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली लढत आयर्लंड विरुद्ध होत आहे. वेस्ट इंडिड आणि अमेरिकेत होत असलेल्या या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ग्रुप A मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यजमान अमेरिकेचा समावेश आहे. 2007 साली झालेला पहिला टी20 वर्ल्ड कप भारतीय टीमनं जिंकला होता. त्यानंतर गेल्या 17 वर्षात भारताला हा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. प्रत्येक वर्ल्ड कपप्रमाणे यंदाही भारतीय टीम विजेतेपदाची दावेदार आहे. 

रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीमला हा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर सर्वोत्तम प्लेईंग 11 ची निवड करावी लागेल. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाची बेस्ट प्लेईंग 11 कोणती आणि का? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रोहित शर्मा

टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून अर्थातच रोहित शर्माचं नाव पहिलं येतं. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितच्या नावावर टी20 इंटरनॅशनलमध्ये आत्तापर्यंत 5 सेंच्युरी आहेत. कोणत्याही बॉलर्सवर प्रतिहल्ला करण्याची क्षमता रोहितकडं आहे. पहिल्या 6 ओव्हरमधील पॉवर प्लेमध्ये टीमला आक्रमक सुरुवात करुन देण्याची जबाबदारी रोहितनं स्वत:च्या खांद्यावर घेतलीय. त्याची 'पॉवर प्ले' मधील बॅटिंग टीमसाठी निर्णायक ठरणार आहे. त्याचबरोबर तो जितक्या जास्त ओव्हर्स खेळेल तितका भारताला फायदा होईल.

( नक्की वाचा : टीम इंडियासाठी 2 चांगल्या बातम्या, गुरु-शिष्य खूश )
 

यशस्वी जैस्वाल

मुंबईच्या 22 वर्षांच्या यशस्वीनं सर्वच फॉर्मेटमध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली. आयपीएल 2024 मधील फर्स्ट हाफमध्ये तो फेल गेला. पण सेकंड हाफमध्ये त्यानं कमबॅक केलं. यशस्वीचा फॉर्म हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा फॅक्टर आहे. पॉवर प्लेनंतरही वेगानं रन जमवण्याची क्षमता यशस्वीनं दाखवून दिलीय. त्यामुळे तो ओपनिंगसाठी रोहित शर्माचा योग्य पार्टनर आहे.

विराट कोहली

T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक रन्स करणारा भारतीय. मागच्या वर्षी झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये विराट 'प्लेयर ऑफ द सीरिज' होता. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये विराटनं सर्वाधिक रन्स करण्यासाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप पटकावली होती. विराट कोहली सध्या जबदरस्त फॉर्ममध्ये आहे. गेली अनेक वर्ष तीन नंबरवर खेळणारा विराट या वर्ल्ड कपसाठी देखील टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. वेस्ट आणि अमेरिकेतील आव्हानात्मक पिचवर विराटचा क्लास आणि अनुभव उपयोगी ठरणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : टी 20 विश्वचषक सेमी फायनलमध्ये हे 4 संघ पोहोचतील; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी )
 

सूर्यकुमार यादव

टीम इंडियाचा T20 फॉर्मेटमधील महत्त्वाचा खेळाडू. सूर्यकुमार या प्रकारातील स्पेशालिस्ट खेळाडू आहे. वन-डे वर्ल्ड कपमध्ये तो अपयशी ठरला होता. या अपयशाची भरपाई करण्याची संधी सूर्याला आहे. 

ऋषभ पंत

कार अपघातामुळे ऋषभ पंत एक वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेटपासून दूर होता. आपण फक्त बॅटिंगसाठीच नाही तर विकेट किपर म्हणून देखील फिट आहोत हे पंतनं दाखवून दिलंय. पंतनं आयपीएल 2024 मध्ये समाधानकारक कामगिरी करत टीम इंडियात जागा मिळवलीय. तो आक्रमक डावखुरा खेळाडू असल्यानं मिडल ऑर्डरमध्ये त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. मोठ्या मॅचमध्ये सर्वोत्तम खेळ करण्याचा पंतचा रेकॉर्ड आहे. याच रेकॉर्डममुळे तो संजू सॅमसनच्या आधी त्याची प्लेईंग 11 मध्ये निवड होऊ शकते.

Advertisement

हार्दिक पांड्या

हार्दिकला दुखापतीमुळे वन-डे वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं होतं. आयपीएलमध्येही तो फेल गेला. त्यानंतरही हार्दिक टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला व्हाईस कॅप्टन केल्यानं ते सिद्धही झालंय. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात त्यानं दमदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर तो नेटमध्ये बॉलिंगमध्येही चांगलाच घाम गाळलाय. टीमचं संतुलन कायम ठेवण्यासाठी हार्दिक पांड्या हा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा फॉर्म टीम इंडियाच्या विजेतेपदात निर्णायक ठरु शकतो.

( नक्की वाचा : हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर आगरकरनं एकाच वाक्यात दिलं उत्तर )
 

रविंद्र जाडेजा

टीम इंडियाचा अनुभवी ऑल राऊंडर. जाडेजा T20 प्रकारातील महत्त्वाचा खेळाडू आहे. वर्ल्ड कपमधील पिचवर त्याची बॉलिंग उपयुक्त ठरु शकते. त्याचबरोबर त्याचा बॅटिंगमधील फॉर्म देखील महत्त्वाचा आहे.

Advertisement

अक्षर पटेल

वर्ल्ड कपसाठी चार स्पिनर घेण्याचा आग्रह रोहित शर्मानं केला होता. रोहितच्या या आग्रहामुळेच अक्षरची प्लेईंग 11 मधील निवड महत्त्वाची आहे. अक्षर पटेलमुळे रोहितला बॉलिंगमध्ये आणखी एक पर्याय मिळणार आहे. त्याचबरोबर गरज पडली तर वरच्या क्रमांकावर येऊन परिस्थितीप्रमाणे बॅटिंग करण्याची अक्षरमध्ये क्षमता आहे.

कुलदीप यादव

मर्यादीत ओव्हर्स क्रिकेटमधील भारताचा बेस्ट स्पिनर. मिडल ओव्हर्समध्ये विकेट घेत समोरच्या टीमला दबावात टाकण्याचं काम कुलदीप करतो.

( नक्की वाचा : 'KKR मध्ये घालवलेला काळ सर्वात खराब', टीम इंडियाच्या स्टारनं सांगितली 'मन की बात' )
 

जसप्रीत बुमराह

भारताचाच नाही तर क्रिकेट विश्वातील सध्याचा सर्वोत्तम फास्ट बॉलर. पॉवर प्ले पासून ते डेथ ओव्हर्सपर्यंत मॅचमधील कोणत्याही टप्प्यात बॉलिंग करण्याची बुमराहमध्ये क्षमता आहे. तो रोहित शर्माचा बॉलिंगमधील हुकमी एक्का आहे.

अर्शदीप सिंग

T20 प्रकारात टीम मॅनेजमेंटनं अर्शदीपवर सातत्यानं विश्वास दाखवलाय. डावखुरा फास्ट बॉलर असल्यानं त्याच्या समावेशानं टीम इंडियाच्या बॉलिंगमध्ये वैविध्यता येणार आहे. डेथ ओव्हर्समध्येही सातत्यानं बॉलिंग करण्याचा अर्शदीपकडं अनुभव आहे.

टीम इंडियाची बेस्ट 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेट किपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग