जाहिरात

टी 20 विश्वचषक सेमी फायनलमध्ये हे 4 संघ पोहोचतील; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

येत्या 2 जूनपासून टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. टीम इंडिया 5 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये यंदाचा विश्वचषक खेळला जाणार आहे.  

टी 20 विश्वचषक सेमी फायनलमध्ये हे 4 संघ पोहोचतील; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

टी- 20 विश्वचषक सुरु होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघांचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकाच्या सेमी फायनमध्ये कोणते संघ पोहोचणार याबाबत सुनील गावस्कर यांनी मोठा दावा केला आहे. भारतीय संघाला टी 20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावस्कर यांनी म्हटलं की, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील असा दावा केला आहे. गावस्कर यांनी पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये जागा दिलेली नाही. येत्या 2 जूनपासून टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. टीम इंडिया 5 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये यंदाचा विश्वचषक खेळला जाणार आहे.  

( नक्की वाचा : ऑस्ट्रेलियाला पाणी पाजणाऱ्या दिग्गज खेळाडूला व्हायचंय टीम इंडियाचा कोच )

भारताने 2007 मध्ये टी 20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याशिवाय 2010 मध्ये इंग्लंड आणि 2012 मध्ये वेस्ट इंडीजने विश्वचषक आपल्या नावे केला होता. 2014 मध्ये श्रीलंका, 2016 मध्ये वेस्ट इंडीज, 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि 2022 मध्ये इंग्लंडने विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीजने दोन वेळा विश्वचषक आपल्या नावे केला आहे.   

नक्की वाचा- Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीसोबत फॅन्सचं गैरवर्तन, त्यानंतर जे झालं ते... Video Viral

टीम इंडियाचे सामने

  • 5 जून- भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क ( रात्री 8 वाजता)
  • 9 जून- भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क, (रात्री 8 वाजता)
  • 12 जून- भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क (रात्री 8 वाजता)
  • 15 जून- भारत विरुद्ध कॅनाडा, फ्लोरिडा ( रात्री 8 वाजता)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com