जाहिरात

T20 World Cup 2026: सूर्यकुमार यादवने मागितली माफी, पण ICCने सोडलं नाही! वर्ल्डकप जिंकूनही अर्शदीप सिंग अडचणीत

T20 World Cup 2026 Final Match: T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा बॅटर डॅरेल मिचेलच्या दिशेने चेंडू फेकणे टीम इंडियाचा वेगवान बॉलर अर्शदीप सिंगला महागात पडले आहे.

T20 World Cup 2026: सूर्यकुमार यादवने मागितली माफी, पण ICCने सोडलं नाही! वर्ल्डकप जिंकूनही अर्शदीप सिंग अडचणीत
"T20 World Cup 2026 Final Match: वर्ल्डकप जिंकूनही अर्शदीप सिंग अडचणीत"

T20 World Cup 2026 Final Match: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा बॅटर डॅरेल मिचेलवर बॉलने निशाणा साधणं महागात पडलंय. अर्शदीपवर आयसीसी कोडच्या लेव्हल-1 चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, त्याला मॅच फीसमधून 15 टक्के दंड भरावा लागणार आहे. रविवारी (8 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनल मॅचमध्ये अर्शदीपने टाकलेला बॉल मिचेलने डिफेंड केला, जो थेट अर्शदीपच्या हातात गेला. अर्शदीपने तो चेंडू थेट मिचेलच्या दिशेने भिरकावला, जो मिचेलच्या पॅडला लागला. यामुळे मिचेल कमालीचा संतापला आणि अर्शदीपवर ओरडू लागला होता.

(नक्की वाचा : Ishan Kishan: ईशान किशनने जर्सीच्या आत स्पोर्ट्स ब्रा घातली होती? VIDEO होतोय व्हायरल, नेटकरी करत आहेत ट्रोल)

कलम 2.9चे उल्लंघन केल्याने अर्शदीप दोषी

आता अर्शदीपला याचा फटका सहन करावा लागतोय. अर्शदीप आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.9च्या (Article 2.9) उल्लंघनासाठी दोषी आढळला आहे. हा नियम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी लागू असतो. या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान जर एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूच्या दिशेने चेंडू किंवा क्रिकेटशी संबंधित इतर कोणतीही वस्तू फेकतो किंवा गैरवर्तन करतो, तर तो या नियमाच्या उल्लंघनासाठी दोषी धरला जातो. अर्शदीपला त्याच्या या वर्तणुकीसाठी एक 'डिमेरिट पॉइंट' (Demerit Point) देखील देण्यात आला आहे. हा गुण त्याच्या शिस्तविषयक रेकॉर्डमध्ये (Disciplinary Record) जोडला गेला आहे.

(नक्की वाचा : T20 WC 2026: BCCI चा खजिना उघडला! 131 कोटींच्या बक्षीसाची अशी होणार विभागणी; कुणाला किती मिळणार? वाचा सविस्तर)

कॅप्टन सूर्यकुमारने सावरली होती परिस्थिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात हा प्रकार घडला होता. न्यूझीलंडच्या डावातील 11 वी ओव्हर सुरू होती आणि अर्शदीप बोलिंग करत होता. याच दरम्यान अर्शदीपने आक्रमकपणे मिचेलला लक्ष्य करत बॉल फेकला, जो थेट त्याच्या पॅडला लागला. मिचेल यामुळे खूप नाराज झाला होता. नंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने मध्यस्थी करत मिचेलची माफी मागितली आणि परिस्थिती शांत केली.

(नक्की वाचा : T20 World Cup 2026 Final: अंतिम सामन्यात धोनी-रोहित उपस्थित, विराट कोहली का दिसला नाही?)

अर्शदीपने मागितली होती मिचेलची माफी

मैदानावर दुसऱ्या टोकाला उभे असलेले अंपायर देखील अर्शदीपला काहीतरी समजावून सांगताना दिसले होते. टीम इंडियाने जेतेपद पटकावल्यानंतर अर्शदीपने स्वतः मिचेलकडे जाऊन त्याची माफीही मागितली होती. पण त्याच्या माफीचा फारसा परिणाम झाला नाही आणि आयसीसीने त्याच्यावर मोठा दंड ठोठावला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com