IND vs ENG : भारतीय बॉलरनं घेतली अजब हॅटट्रिक, तुमच्या लक्षात आली का?

IND vs ENG T20 World Cup Semifianl : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सेमी फायनलमध्ये अक्षर पटेल टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IND vs ENG T20 World Cup Semifianl : टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं इंग्लंडचा 68 रन्सनी पराभव केला.भारताच्या या विजयात अक्षर पटेलच्या बॉलिंगचा मोठा वाटा होता. अक्षरनं या मॅचमध्ये 3 विकेट्स घेतल्या. अक्षरला या बॉलिंगसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अक्षरनं 4 ओव्हर्समध्ये 23 रन देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानं जॉनी बेअरस्टो, जोस बटलर आणि मोईन अली या इंग्लंडच्या टॉप ऑर्डर बॅटर्सना आऊट केलं. त्यामुळेच त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अक्षरनं घेतलेल्या 3 विकेट्समध्ये एक अजब रेकॉर्ड झाला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट (Axar Patel UNIQUE Hattrick)

इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये अक्षर पटेल जे्ंव्हा बॉलिंगला आला त्यावेळी त्यानं ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेतली. अक्षरनं सर्व विकेट्स ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर घेतल्या. या अजब पद्धतीनं त्यानं हॅटट्रिक घेतली. हा कोणता रेकॉर्ड नसला तरी एक अनोखा योग नक्कीच आहे. 

अक्षरनं इंग्लंडच्या इनिंगमधील 4 ते 8 ओव्हर्सच्या दरम्यान सलग तीन ओव्हर बॉलिंग केली. यामध्ये त्यानं प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेत इंग्लंडला अडचणीत आणलं. अक्षर इंग्लंडच्या इनिंगमधील चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॉलिंगला आला. त्यानं चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर जोस बटलरला आऊट केलं. त्यानंतर तो सहाव्या ओव्हरला बॉलिंगला आला. त्यानं पहिल्याच बॉलवर बेअरस्टोला आऊट करत इंग्लंडच्या कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिलाी. यावेळी देखील अक्षरनं ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. 

( नक्की वाचा : T-20 World Cup : सलग दुसऱ्या सामन्यात रोहित चमकला, अर्धशतकी खेळीसह केले अनोखे विक्रम )
 

त्यानंतर तो आठव्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आला. यावेळी देखील त्यानं मागील दोन ओव्हर्सप्रमाणे पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. यावेळी त्यानं मोईन अलीला परत पाठवलं. या पद्धतीनं अक्षरनं सलग तीन ओव्हरमधील पहिल्या बॉलवर विकेट घेण्याची कमाल केली. 

Advertisement

रोहितची हाफ सेंच्युरी

सेमी फायनलमध्ये टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या भारतीय टीमनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 171 रन केले. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मानं हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं 57 रन केले. सूर्यकुमार यादवनं 47 रन करत त्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्यानं 13 बॉलमध्ये 23 रन काढले. विराट कोहलीचा बॅडपॅच सेमी फायनलमध्येही सुरुच होता. तो फक्त 9 रन काढून आऊट झाला. 

Topics mentioned in this article