जाहिरात
Story ProgressBack

T-20 World Cup : सलग दुसऱ्या सामन्यात रोहित चमकला, अर्धशतकी खेळीसह केले अनोखे विक्रम

Read Time: 3 mins
T-20 World Cup : सलग दुसऱ्या सामन्यात रोहित चमकला, अर्धशतकी खेळीसह केले अनोखे विक्रम
Rohit Sharma ची कर्णधारपदाला साजेशी खेळी (फोटो सौजन्य - BCCI)
मुंबई:

टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रभावी खेळी केली आहे. सुपर ८ फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीत ९२ धावांची खेळी केल्यानंतर रोहितने उपांत्य सामन्ययात इंग्लंडविरुद्ध आक्रमक ५७ धावांची खेळी करत संघाला सावरलं.

भारतीय संघ संकटात सापडलेला असताना रोहितने आपल्या आक्रमक शैलीत इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार लगावत ५७ धावा केल्या. आदिल रशिदच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. या खेळीदरम्यान रोहित शर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले.

अवश्य वाचा - T-20 World Cup : फिरकीच्या जाळ्यात अडकला 'साहेबांचा संघ', हिटमॅनची टीम इंडिया अंतिम फेरीत

कर्णधार या नात्याने रोहित शर्माने भारतीय संघाकडून ५ हजार धावा पूर्ण केल्या. भारतीय कर्णधारांच्या यादीत रोहित सध्या पाचव्या स्थानावर आहे.

भारताकडून सर्वाधिक धावा करणारे कर्णधार - 

१) विराट कोहली - १२ हजार ८८३
२) महेंद्रसिंह धोनी - ११ हजार २०७
३) मोहम्मद अझरुद्दीन - ८ हजार ९५
४) सौरव गांगुली - ७ हजार ६४३
५) रोहित शर्मा - ५ हजार १२

याचसोबत टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा महेला जयवर्धनेचा विक्रमही रोहितने यादरम्यान मोडला.
१) रोहित शर्मा - ११३ चौकार
२) महेला जयवर्धने - १११ चौकार
३) विराट कोहली - १०५ चौकार
४) डेव्हिड वॉर्नर - १०३ चौकार
५) तिलकरत्ने दिलशान - १०१ चौकार

कर्णधार या नात्याने रोहितने या अर्धशतकी खेळीदरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतर रोहितलाच फक्त हा कारनामा जमला आहे. 

एखाद्या टी-२० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीतही रोहितने विराटला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे.

Latest and Breaking News on NDTV


याचसोबत एका टी-२० स्पर्धेत किंवा मालिकेत भारताकडून सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहितने विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

Latest and Breaking News on NDTV

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माची ही १६ वी 50 + इनिंग होती. यासह त्याने न्यूझीलंडच्या केन विल्यमसनशी बरोबरी केली आहे.

तसेच एका टी-२० वर्ल्डकपमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. पाहा कोण आहे या यादीत...
१) बाबर आझम - ५ वेळा
२) रोहित शर्मा - ४ वेळा
३) ख्रिस गेल - ३ वेळा
४) कुमार संगकारा - ३ वेळा
५) जोस बटलर - ३ वेळा

एका टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहितने जोस बटलरला माघारी धाडलं. पाहा ही यादी...
१) बाबर आझम - ३०३ धावा - २०२१
२) रोहित शर्मा - २४८ धावा - २०२४*
3) जोस बटलर - २२५ धावा - २०२२

रोहित शर्माने या खेळीदरम्यान टी-२० वर्ल्डकमध्ये ५० षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो ख्रिस गेलनंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. १०० चौकार आणि ५० षटकार टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात लगावणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही रोहितची बॅट अशीच चालते का हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
T-20 World Cup : फिरकीच्या जाळ्यात अडकला 'साहेबांचा संघ', हिटमॅनची टीम इंडिया अंतिम फेरीत
T-20 World Cup : सलग दुसऱ्या सामन्यात रोहित चमकला, अर्धशतकी खेळीसह केले अनोखे विक्रम
T20 World Cup IND vs ENG Semi Final Axar Patel unique hattrick against England shocked the world cricket
Next Article
IND vs ENG : भारतीय बॉलरनं घेतली अजब हॅटट्रिक, तुमच्या लक्षात आली का?
;