IND vs ENG : विराटचा बॅडपॅच संपणार? रोहित शर्माला कुणाचा धोका? वाचा टीम इंडियासमोरची आव्हानं

Ind vs Eng Key Player Battles: विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंवर टीम इंडियाची भिस्त असेल. तर इंग्लंडकडं जोस बटलर, फिल सॉल्ट, जोफ्रा आर्चर सारखे आक्रमक खेळाडू आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
India vs England T20 World Cup 2024 Semi-Final (Photo AFP)
मुंबई:

Ind vs Eng 4 Key Player Battles: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल (T20 World Cup 2024 Sem Final) गयानामध्ये खेळली जाणार आहे. या मॅचमधील विजेत्याची लढत फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होईल. भारतीय टीम या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित आहे. आता सेमी फायनलमध्ये टीमसमोर तगडं आव्हान आहे. दोन्ही टीममध्ये काही असे खेळाडू आहेत जे एकहाती सामना फिरवू शकतात. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंवर टीम इंडियाची भिस्त असेल. तर इंग्लंडकडं जोस बटलर, फिल सॉल्ट, जोफ्रा आर्चर सारखे आक्रमक खेळाडू आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विराट कोहली वि. आदिल राशिद (Virat Kohli vs Adil Rashid)

सेमी फायनलमध्ये विराट वि. रशिद हा मुकाबला पाहायला मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रशिदनं आत्तापर्यंत विराटला 9 वेळा आऊट केलंय. या वर्ल्ड कपमध्ये विराट फॉर्मात नाही. त्याचा फायदा उठवण्याचा रशिद प्रयत्न करेल. तर दुसरिकडं मोठ्या सामन्यात विराट नेहमीच सरस खेळतो. टी20 वर्ल्ड कपच्या 3 सेमी फायनलमध्ये विराटनं 72,89 आणि 50 रन केले आहेत. या दोघांमधील लढत पाहण्यासारखी असेल. 

कुलदीप यादव वि. हॅरी ब्रूक (Kuldeep Yadav vs Harry Brook)

हॅरी ब्रूक इंग्लंडचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची बॅट चालली तर टीम इंडिया अडचणीत येऊ शकते. त्यामुळे सेमी फायनलमध्ये ब्रूक बॅटिंगला येईल त्यावेळी कॅप्टन रोहित शर्मा कुलदीप यादवला बॉल देऊ शकतो. कुलदीपची या वर्ल्ड कपमधील कामगिरीही दमदार झालीय.

ट्रेंडींग बातमी - IND vs ENG सेमी फायनलवर पावसाचं सावट, मॅच रद्द झाली तर टीम इंडियाचं काय होणार?
 

रोहित शर्मा वि. जोफ्रा आर्चर (Rohit Sharma vs Jofra Archer)

आक्रमक बॅटींगनं ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढणारा रोहित शर्मा जोफ्रा आर्चरसमोर कसा खेळेल? याची सर्वांना उत्सुकता आहे. टी-20 मध्ये जोफ्रानं रोहितला 3 वेळा आऊट केलं होतं. रोहित यंदा जबरदस्त फॉर्मात आहे. त्याचा आणि जोफ्राचा सामना लक्षवेधी ठरु शकतो. 

Advertisement

ट्रेंडींग बातमी - भारताच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर इंझमाम-उल-हकनं केला खळबळजनक आरोप
 

जसप्रीत बुमराह वि. जॉस बटलर (Jasprit Bumrah vs Jos Buttler)

बुमराह विरुद्ध बटलर या लढतीकडंही संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. बुमराह या स्पर्धेत टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड आहे. त्याच्यापुढं इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरचं आव्हान असेल. मागील टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये बटलरनं भारतीय बॉलर्सची धुलाई केली होती. त्याचा वचपा काढण्याची संधी यंदा बुमराहला आहे.