R Ashwin on Thalapathy Vijay : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे सुपरस्टार आणि आता नवनिर्वाचित आमदार विजय थलापति! आपल्या पहिल्याच निवडणुकीत विजय यांनी असा काही चमत्कार केलाय की प्रस्थापित राजकीय पक्ष अवाक झाले आहेत. विजय यांच्या टीव्हीके (तमिलगा वेटट्री कळगम) पक्षाने तब्बल 108 जागा जिंकून नवा इतिहास रचला आहे. या विजयानंतर क्रिकेटपटू आर. अश्विन याने त्यांचे अभिनंदन केले, पण एका नेटकऱ्याने अश्विनला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर अश्विनने दिलेल्या उत्तराने आता सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
विजय यांचा 'थलापति' ते लोकप्रतिनिधी असा प्रवास
विजय थलापति यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना वाटले होते की ते फक्त ग्लॅमरपुरते मर्यादित राहतील. मात्र, त्यांनी राज्यातील सर्व 234 जागांवर आपले उमेदवार उभे करून सर्वांना चकीत केले. निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा विजय यांचा पक्ष 108 जागांसह तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष ठरला. बहुमताच्या 118 या आकड्यापासून ते फक्त 10 जागा दूर राहिले असले, तरी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मिळवलेले हे यश थक्क करणारे आहे.
(नक्की वाचा : Tamil Nadu Election 2026 महिलांना सोनं ते तरुणांना पगार; Thalapathy Vijay यांनी कशी जिंकली तामिळनाडू निवडणूक? )
अश्विन झाला विजय यांचा फॅन
विजय यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर अश्विनने सोशल मीडियावर मनापासून त्यांचे कौतुक केले. अश्विनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, थलापति आणि त्यांच्या पक्षाचे या शानदार यशाबद्दल अभिनंदन. मी त्यांचा खूप मोठा फॅन तर आहेच, पण आता मला अशा नेत्याचा अनुयायी व्हायला आवडेल ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायला मिळेल.
Naalaiya Theerpu to Netraiya Theerpu!!
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) May 5, 2026
Congratulations to Thalapathy and his party for the fabulous result.
Good luck & I would love to go from being your super fan to a leader I would want to follow for what lies ahead.🤝🙏 pic.twitter.com/NG2zMdiTDa
अश्विनच्या या पोस्टने चाहत्यांची मने जिंकली, पण काही लोकांनी अश्विनला त्याच्या पार्श्वभूमीवरून ट्रोल करायला सुरुवात केली.
'भीती वाटतेय का?', ट्रोलरला अश्विनचा सडेतोड पलटवार
एका युझरने अश्विनला ट्रोल करताना लिहिले की, अश्विन हा असा ब्राह्मण व्यक्ती आहे ज्याला द्रविडीयन राजवटीची भीती वाटते. या कमेंटवर अश्विनने आपल्या नेहमीच्या परखड शैलीत या ट्रोलरला आरसा दाखवला. अश्विन म्हणाला की, मी कोणाच्या पोटी जन्म घेतला हे माझ्या हातात नव्हते. मला माझे आई-वडील आणि गुरू यांनी एकच शिकवले आहे की, नेतृत्व म्हणजे इतरांच्या संघर्षाबद्दल सहानुभूती बाळगणे. ज्या दिवशी आपण जात आणि वंशावर बोलणे बंद करू, तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत राहू इच्छितो, अशा शब्दांत अश्विनने ट्रोलरची बोलती बंद केली.
Have said it once, i will say it again!
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) May 5, 2026
Who i was born to wasn't my choice, thankfully I was born to parents that are beyond great.
Leadership is feeling empathetic towards another person's struggles and enabling growth beyond barriers & that's what my parents & teachers have… https://t.co/4iHd9cnf0R
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world