Team India Jersey Sponsorship: टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणं 'अशुभ'? या 5 कंपन्यांचं दिवाळ निघालं

ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या 'ड्रीम11' ने भारतीय संघाच्या जर्सीचा प्रायोजक म्हणून 358 कोटी रुपयांचा करार केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Team India Jersey Sponsorship : भारतीय क्रिकेट संघाला केवळ भारतातच नाही, तर जगभरात मोठी लोकप्रियता आहे. त्यामुळे टीम इंडियाची जर्सी स्पॉन्सरशिप मिळवणे हे कोणत्याही कंपनीसाठी एक मोठा सन्मान मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ज्या कंपन्यांनी ही स्पॉन्सरशिप घेतली, त्यातील अनेक कंपन्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ही स्पॉन्सरशिप 'अशुभ' तर नाही ना, अशी चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या 'ड्रीम11' ने भारतीय संघाच्या जर्सीचा प्रायोजक म्हणून 358 कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र, आता त्यांनी हा करार रद्द केला आहे. भारतात ऑनलाइन गेमिंगवर लागू झालेल्या नवीन कायद्यांमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. या कायद्यामुळे ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींवर मोठे निर्बंध आले आहेत. ड्रीम11 कंपनीने 2023 ते 2025 या कालावधीसाठी हा करार केला होता, परंतु आता तो मुदतीपूर्वीच संपुष्टात आला आहे.

(नक्की वाचा-  Team India: ड्रीम 11 बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाच्या जर्सीवर कोण? स्पॉन्सरसाठी 3 कंपन्यांची नावं चर्चेत)

जर्सी स्पॉन्सरशिप अशुभ ठरलेल्या कंपन्या

सहारा इंडिया परिवार (2001-2013): सहाराने दीर्घकाळ टीम इंडियाची स्पॉन्सरशिप सांभाळली. मात्र, नंतर कंपनीला 'सेबी'च्या कारवाईला सामोरे जावे लागले आणि त्यांचे मोठे उद्योग साम्राज्य कोसळले.

स्टार (2014-2017): स्टार इंडियाने ही स्पॉन्सरशिप घेतली. या काळात त्यांना अँटीट्रस्ट नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चौकशीला सामोरे जावे लागले आणि त्यांच्या 'हॉटस्टार' या स्ट्रीमिंग सेवेतही मोठा तोटा झाला.

Advertisement

ओप्पो (2017-2020): 1,079 कोटी रुपयांचा मोठा करार करूनही ओप्पो कंपनीने मुदतीपूर्वीच हा करार सोडला.

(नक्की वाचा- Online Gaming Bill 2025: Dream11, MPL सह सर्वच 'पेड गेम्स' बंद, तुमच्या पैशांचं काय होणार?)

बायजूज् (2020-2022): बायजूजने स्पॉन्सरशिप घेतल्यावर त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कर्जाची परतफेड न झाल्यामुळे त्यांच्यावर 'इन्सॉल्व्हेंसी पिटिशन' दाखल झाली आणि 'एनसीएलटी'मध्ये खटला दाखल झाला.

या सर्व घटना पाहता, अनेकजण आता बीसीसीआयच्या स्पॉन्सरशिपला व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे, तर 'अशुभ' मानू लागले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयला नवीन प्रायोजक शोधताना मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.

Advertisement

Topics mentioned in this article