डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन!

तुम्हाला हे वाचायला आणि ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर येताच विराट कोहलचे अच्छे दिन पुन्हा सुरु होणार, ही आशा भारतीय फॅन्सच्या मनात निर्माण झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Donald Trump and Virat Kohli :  तुम्हाला हे वाचायला आणि ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर येताच विराट कोहलचे अच्छे दिन पुन्हा सुरु होणार, ही आशा भारतीय फॅन्सच्या मनात निर्माण झाली आहे. ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले होते त्यावेळी विराट कोहलीचा सुवर्णकाळ सुरु होता. डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी 20 जानेवारी 2017 ते 20 जानेवारी 2021  या कालावधीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्या कालावधीमध्ये विराट क्रिकेट विश्वाचा किंग होता. विराट कोहलीनं या काळातील 147 मॅचमधील 167 इनिंगमध्ये 62.28 च्या सरासरीनं 8720 रन काढले होते. त्यानं या कालावधीत 28 सेंच्युरी आणि 40 हाफ सेंच्युरी झळकावल्या.  विराटचा 254 हा सर्वोच्च स्कोअर देखील याच कालावधीतील आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ट्रम्पच्या कार्यकाळातील विराटचं प्रदर्शन

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 ते 2020 या कालावधीतील 34 टेस्ट मॅचमधील 57 इनिंगमध्ये 58.66 च्या सरासरीनं 3109 रन केले होते. यामध्ये 12 सेंच्युरी आणि 9 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. विराट कोहलीचा टेस्टमधील सर्वोच्च 254 हा सर्वोच्च स्कोअर याच कालखंडातील आहे. 

Advertisement

टेस्ट क्रिकेटमध्ये या कालावधीमध्ये विराटपेक्षा जास्त रन फक्त जो रुटनं केले होते. त्यानं 45 मॅचमधील 81 इनिंगमध्ये 3458 रन काढले होते. या कालावधीमध्ये त्यानं 7 सेंच्युरी आणि 22 हाफ सेंच्युरी झळकावल्या होत्या.

Advertisement

विराटनं वन-डे क्रिकेटमध्ये या कालावधीत 73 मॅचमधील 72 इनिंगमध्ये 74.82 च्या जबरदस्त सरासरीनं 4340 रन काढले होते. या कालावधीत त्याचा स्ट्राईक रेट 97.94 इतका होता. त्यानं ट्रम्प सरकारच्या राजवटीत वन-डे क्रिकेटमध्ये 16 सेंच्युरी आणि 22 हाफ सेंच्युरी झळकावल्या होत्या. 160 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. विराट या कालावधीमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन काढणारा क्रिकेटपटू होता. विराटनंतर रोहित शर्माचा नंबर होता. त्यानं 71 मॅचमध्ये 65.31 च्या सरासरीनं 3984 रन केले होते. 

Advertisement

( नक्की वाचा : US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक? 6 गोष्टी ठरल्या निर्णायक )

आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये या कालावधीत सर्वाधिक रन काढणाऱ्या बॅटर्सच्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर होता. त्यानं 40 मॅचमध्ये 43.82 च्या सरासरीनं 1271 रन काढले. त्यामध्ये 9 हाफ सेंच्युरींचा समावेश होता.

ट्रम्प जाताच गमावला फॉर्म

डोनाल्ड ट्रम्प यांचा 2020 मधील निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर विराटच्या बॅटमधील धावांचा ओघ देखील कमी झाला. 20 जानेवारी 2021 नंतर विराटनं 31 टेस्टमध्ये 33.11 च्या सरासरीनं 1722 रन काढले. त्यानं या कालावधीमध्ये फक्त 2 सेंच्युरी झळकावल्या. वन-डे क्रिकेटमध्ये त्यानं 44 मॅचमध्ये 51.83 च्या सरासरीनं 1866 रन काढले होते. तर 40 टी20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 1260 रन काढले. 

ट्रम्पबरोबर करण्यात आली होती तुलना

भारतीय क्रिकेट टीम 2017 साली विराट कोहलीच्या नेतृत्त्वामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. टीम इंडियानं त्या सीरिजमधील पहिली टेस्ट मॅचमध्ये 75 रननं जिंकली. दुसरी टेस्ट ड्रॉ झाली. ऑस्ट्रेलियावर सीरिज गमावण्याचं सावट होतं. त्यामुळे सैरभैर झालेल्या ऑस्ट्रेलियन मीडियानं विराट कोहलीची तुलना डोनाल्ड ट्रम्पबरोबर केली होती. 

टेलिग्राफ या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातीन बेन हॉर्न यांच्या लेखात ही तुलना करण्यात आली होती. या लेखात 'राष्ट्रपती कोहली' (ट्रम्प सारख्या) खोट्या बातम्या पसरवत आहे, असा बेछुट आरोप करण्यात आला होता. 

( नक्की वाचा : US Election 2024 : अमेरिकेला कशाची गरज? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयी भाषणातील 10 प्रमुख मुद्दे )

भारताचा कॅप्टन विराट कोहलीचा स्वत:चाच कायदा आहे. आयसीसी किंवा अगदी त्याच्या बोर्डाचाही त्यावर अंकुश नाही. त्याला सातत्यानं खोट्या बातम्या पसरवण्यासाठी जबाबदार धरलं जात नाही. राष्ट्रपती ट्रम्पसारखंच कोहलीनं देखील त्याच्यावरील टीकेसाठी मीडियाला दोषी ठरवण्याचा निर्णय घेतला आहे,' असा आरोप या लेखात करण्यात आला होता. 

Topics mentioned in this article