टी 20 वर्ल्ड कपमध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळत आहे. अनेक छोट्या संघांना शानदार कारगिरी करत बलाढ्या संघांना नमवलं आहे. यामध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा केलेल्या पराभवाचाही समावेश आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करत सर्वांनाच सरप्राईज केलं. या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत 'गट अ' अव्वल स्थानी झेप घेतली.
(नक्की वाचा - T-20 WC 2024 : पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होणार? अमेरिकेच्या विजयाने संपूर्ण समीकरण बदललं)
कॅनडाकडून आयर्लंडचा पराभव
कॅनडा संघ आयर्लंडपेक्षा कमकुवत मानला जातो. मात्र कॅनडाने देखील आयर्लंडवर आश्चर्यकारकरित्या 12 धावांनी पराभव केला. कॅनडा संघाने 135 धावांचं लक्ष्य आयर्लंडसमोर ठेवलं होतं. मात्र आयर्लंड संघाला केवळ 125 धावाच करता आल्या.
अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं
स्पर्धेतील 14 वा सामना अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडला विजयाचा दावेदार मानलं जात होतं. मात्र सामन्याच्या निकाल वेगळाच लागला. अफगाणिस्तानने न्यूझीलंडसमोर 159 धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडचा संघ अवघ्या 75 धावांवर गारद झाला. अफगाणिस्तानने या सामन्यात न्यूझीलंडचा 84 धावांनी पराभव केला. त्याआधी टी 20 वर्ल्ड कप विजेत्या श्रीलंकेला बांगलादेशने धुळ चारली आहे.
(नक्की वाचा- अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, बाबर आझमनं कुणावर फोडलं खापर?)
या दोन संघांचं भारत कनेक्शन
टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमेरिका, अफगाणिस्तान आणि कॅनडा संघाचं भारतीय कनेक्शन देखील आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्याकडून खेळणारे अनेक खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. तर अफगाणिस्तानच्या कोचिंग स्टाफमध्ये भारतीय क्रिकेटर्सचा भरणा आहे. यामुळे या सर्व संघाच्या यशात भारतीय खेळाडूंना वाटा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world