Team India Victory Parade : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा 7 रननं पराभव करत टी20 वर्ल्ड कप 2024 चं विजेतेपद पटकावलं. भारतीय क्रिकेट टीमचं याबरोबरच आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवलाय. रोहित शर्माच्या शिलेदारांनी संपूर्ण स्पर्धेत विजेतेपदाच्या थाटात खेळ केला. एकही सामना न जिंकता विजेतेपद पटकावण्याचा रेकॉर्ड केला. त्याबद्दल भारतीय टीमचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. या विजेतेपदाची शिल्पकार असलेली भारतीय टीम विशेष विमानानं मायदेशी परतण्यासाठी रवाना झाली आहे. बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे टीम इंडिया काही दिवस हॉटेलमध्येच अडकली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय क्रिकेट टीमला बार्बाडोसहून घेऊन निघालेलं विशेष विमान गुरुवारी (4 जुलै) 6 वाजता दिल्लीत पोहोचेल. दिल्लीत सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रम होणार आहे. तर मुंबईमध्ये संध्याकाळी टीम इंडियाची ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
टीम इंडियानं 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीच्या टीमची विजयी मिरवणूक मुंबईत काढण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी ही भारतीय टीमची मुंबईत विजयी मिरवणूक निघणार आहे. गुरुवारी संध्याकाळी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान ही मिरवणूक निघणार आहे.
( Video सूर्यानं कॅच घेतला म्हणून भारतानं वर्ल्ड कप जिंकला, पुन्हा, पुन्हा पाहा तो प्रसंग )
टीम इंडियाचं गुरुवारचं वेळापत्रक
सकाळी 6 - दिल्ली विमानतळावर आगमन
6.45 - दिल्लीतील ITC मौर्या हॉटेलमध्ये आगमन
9.00 - ITC मौर्या हॉटेलमधून पंतप्रधानांच्या कार्यालयाकडं प्रस्थान
सकाळी 10 ते दुपारी 12 - पंतप्रधानांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रम
12- ITC मौर्या हॉटेलकडं प्रस्थान
12.30 - मौर्या हॉटेलकडून विमानतळाकडं प्रस्थान
2 - दिल्ली विमानतळावरुन मुंबईसाठी उड्डाण
4 - मुंबई विमाळतळावर आगमन
संध्याकाळी 5 ते 7 - मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम ओपन बसमधून मिरवणूक
संध्याकाळी 7 - वानखेडे स्टेडियमवर सत्कार कार्यक्रम