भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. आठवड्यापासून त्याची प्रकृती बरी नव्हती. प्रकृती ढासळल्याने त्याला ठाण्यातील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री उशीरा त्याला ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमधून समोर आली आहे.
नक्की वाचा - बोलणंही होतं कठीण तरीही गाणं गाऊन विनोद कांबळीने जिंकले मन, खास मित्र तेंडुलकरने वाजवल्या टाळ्या
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी यांच्या बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम बुधवारी (3 डिसेंबर 2024) पार पडला. यादरम्यान सचिन तेंडुलकर आणि विनोदी कांबळीच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमींपासून सर्वसामान्य देखील व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. विनोद कांबळीला व्यासपीठावर पाहताच सचिन तेंडुलकर त्याला भेटण्यासाठी गेला आणि हात मिळवला. क्षणभर कोणाकडून हातमिळवणी करण्यात आलीय, हे कांबळीला कळलंच नाही. पण सचिन असल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळी प्रचंड खूश झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय.
In pictures: Cricketer Vinod Kambli's condition deteriorated again, leading to his admission at Akriti Hospital in Thane late Saturday night. His condition is now stable but remains critical. pic.twitter.com/7NBektzQ54
— IANS (@ians_india) December 23, 2024
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल मोठी चर्चा सुरू झाली होती. विनोद कांबळी हा दारूच्या व्यसनातून अनेक शारिरीक आणि मानसिक त्रासांचा सामना करीत आहे. कांबळी अनेक वैद्यकीय समस्यांचा सामना करीत आहेत. कांबळी यापूर्वी 14 वेळा पुनर्वसन केंद्रात गेला आहे. कांबळी याला हार्टअटॅकही आला होता. यानंतर दारूच्या व्यसनामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world