जाहिरात

बोलणंही होतं कठीण तरीही गाणं गाऊन विनोद कांबळीने जिंकले मन, खास मित्र तेंडुलकरने वाजवल्या टाळ्या

Vinod Kambli Song Video : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये कांबळी गायल्यानंतर सचिनने खास मित्रासाठी टाळ्या वाजवल्याचे दिसतंय.  

बोलणंही होतं कठीण तरीही गाणं गाऊन विनोद कांबळीने जिंकले मन, खास मित्र तेंडुलकरने वाजवल्या टाळ्या

Vinod Kambli Song Video : देशातील प्रसिद्ध क्रिकेटपटुंच्या यादीमध्ये विनोद कांबळीच्याही नावाचा समावेश केला जातो. कांबळीने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कित्येक सामने खेळले आहेत. पण कांबळीने क्रिकेटविश्वातून खूप लवकर संन्यास घेतला. कारणं काहीही असली तरी आजही कांबळी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे, आजही चाहत्यांमध्ये त्याची जादू कायम आहे. दुसरीकडे विनोद कांबळीची प्रकृती सध्या ठीक नाही. अशा एका आजाराने त्याला ग्रासलंय की तो ठीक संवाद साधू शकत नाही आणि चालणंही कठीण ठरतंय. आजाराने त्रासलेला असतानाही विनोद कांबळीने नुकतेच एका कार्यक्रमात गाणे गाऊन उपस्थितांचे मन जिंकले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विनोद कांबळीने गायलं गाणं, सचिनने वाजवल्या टाळ्या

3 डिसेंबर 2024 रोजी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी त्यांचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील सचिन-विनोदच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच कार्यक्रमातील आणखी एक व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये विनोदने रमाकांत आचरेकर यांच्यासाठी गाणे गायले.  

सचिन-विनोदच्या भेटीचा VIDEO VIRAL, कांबळीची अवस्था पाहून नेटकऱ्यांचा तेंडुलकरवर संताप

(नक्की वाचा: सचिन-विनोदच्या भेटीचा VIDEO VIRAL, कांबळीची अवस्था पाहून नेटकऱ्यांचा तेंडुलकरवर संताप)

यावेळेस विनोद कांबळीला बोलणंही कठीण ठरत होतं पण त्याचा उत्साह बराच होता. आचरेकर सरांसाठी त्याने 'सर जो तेरा चकराए' हे सदाबहार गाणे गायलं. ज्याच्यासाठी साधे बोलणे कठीण आहे, त्याने चक्क एखादं गाणे गाऊन दाखवणे फार मोठी बाब आहे. यावेळेस विनोदने सचिनसह उपस्थितांचे मन जिंकले आणि सचिनने आपल्या मित्रासाठी टाळ्या देखील वाजवल्या.  

(नक्की वाचा: मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com