भारत नाही तर या टीममध्ये होणार सेमीफायनल; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा अंदाज

यंदाचा वर्ल्ड कप वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणार आहे. येत्या 1 जूनपासून ते 20 जूनपर्यंत हा टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. आगामी वर्ल्ड कपसाठी सर्व खेळाडू सज्ज झाले आहेत. टी 20 वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकावा, असं प्रत्येक क्रिकेट फॅनला वाटत आहे. मात्र टीम इंडिया सेमी फायनमध्येही पोहोचणार नाही, असा अंदाज इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने वर्तवला आहे. 

मालकल वॉनने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट करत सेमीफायनलमध्ये कोणत्या 4 टीम पोहोचतील याचा अंदाज वर्तवला आहे. मायकल वॉनने लिहिलं की, वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमध्ये इंग्लंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज या टीम्स असतील.

इंग्लंड, वेस्ट इंडीजने दोनदा जिंकलाय वर्ल्ड कप

इंग्लंड आणि वेस्ट इंडीजने दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. एकदा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. तर साऊथ आफ्रिकेला एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे मायकल वॉनने वर्ल्ड कप सेमीफायनलबाबत केलेली भविष्यवाणी खरी होते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Advertisement

कधापासून सुरु होईल टी-20 वर्ल्ड कप? 

यंदाचा वर्ल्ड कप वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणार आहे. येत्या 1 जूनपासून ते 20 जूनपर्यंत हा टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. यावेळी वर्ल्ड कपमध्ये 20 टीम सहभागी होतील. या टीम 4 ग्रुपमध्ये विभागल्या जाणार आहेत. प्रत्येक ग्रुपमधील 2 अशा 8 टीम सुपर 8 मध्ये पोहोचतील. 

वर्ल्ड कप टीम ग्रुप 

  • ग्रुप ए - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए, कॅनडा.
  • ग्रुप बी - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड, ओमान.
  • ग्रुप सी - न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी.
  • ग्रुप डी - साऊथ आफ्रीका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ. 
Topics mentioned in this article