
Mahieka Sharma, Hardik Pandya's new rumoured girlfriend : टीम इंडियाचा प्रमुख ऑल राऊंडर हार्दिक पांड्या हा मैदानातील दमदार कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरच्या प्रकरणामुळेही चर्चेत असतो. हार्दिक आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. या घटस्फोटाची कित्येक दिवस चर्चा सुरु होती. सध्या हार्दिक हा मॉडेल महिका शर्मासोबत डेटिंग करत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये त्यांच्या नात्याची चर्चा सुरू आहे. या दोघांनीही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण फॅन्समध्ये याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. विशेषत: हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड महिका शर्मा कोण आहे? याची अनेकांना उत्सुकता आहे.
कोण आहे महिका शर्मा? (Who Is Mahieka Sharma? )
माहिका शर्मा 24 वर्षांची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असून, इंस्टाग्रामवर तिचे 41.6k फॉलोअर्स आहेत.
फ्री प्रेस जर्नलच्या माहितीनुसार, माहिकाने 2014 ते 2018 या काळात नवी दिल्ली येथील नेव्ही चिल्ड्रेन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर, तिने 2018 ते 2022 या काळात पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिव्हर्सिटी, गुजरात येथून अर्थशास्त्र आणि फायनान्स विषयात पदवी (Bachelor's in Economics and Finance) घेतली. याच काळात तिने 2020 ते 2021 दरम्यान अमेरिकेतील मेरीलँड येथे कम्युनिटी सायकॉलॉजीचाही अभ्यास केला.
याच रिपोर्टनुसार, माहिका शर्माने काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. तिने ऑर्लंडो वॉन आइन्सिडेल यांच्या 'इनटू द डस्क' (Into the Dusk) आणि विवेक ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिकेतील ओमंग कुमार यांच्या 'पीएम नरेंद्र मोदी' (PM Narendra Modi) या चित्रपटात काम केले आहे.
माहिका शर्माने अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या आहेत. तनिष्क (Tanishq), विवो (Vivo), आणि युनिकलो (Uniqlo) या ब्रँड्सच्या जाहिरातीमध्ये ती झळकली आहे.. फॅशनच्या विश्वातील त अनेक प्रसिद्ध भारतीय डिझायनर्ससोबत तिने काम केले आहे, ज्यात अनिता डोंगरे, रितू कुमार, तरुण तहिलियानी, मनीष मल्होत्रा आणि अमित अग्रवाल यांचा समावेश आहे.
माहिकाच्या सोशल मीडियावर अनेकदा ती नवनवीन ठिकाणी प्रवास करताना दिसते. तिने आतापर्यंत फ्रान्स (France), स्पेन (Spain), स्वित्झर्लंड (Switzerland) आणि थायलंड (Thailand) यांसारख्या देशांना भेट दिली आहे.
कधी झाली चर्चेला सुरुवात?
रेडिटवर (Reddit) एका पोस्टमध्ये हार्दिक आणि महिका वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसले. एका फोटोमध्ये हार्दिकचा 33 नंबरचा जर्सी नंबरही दिसत असल्यामुळे त्या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
( नक्की वाचा : घटस्फोटानंतरही प्रेम कायम! नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रिया Viral )
त्यानंतर, ते दोघे इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत असल्याच्या स्क्रीनशॉट्सनीही ऑनलाइन व्हायरल झाले. त्याचवेळी, दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बाथरोबमधील (bathrobe) वेगवेगळे फोटो शेअर केले होते, जे एकाच प्रकारचे असल्याचं फॅन्सनी ओळखलं.
इतकंच नाही तर महिला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात नुकत्याच दुबईमध्ये झालेल्या मॅचच्या दरम्यानही उपस्थित होती. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं. ती स्टँड्समध्ये बसून टीम इंडियाला चीअर करत होती. ती हार्दिकला विशेष चिअर करत असावी, असा अनेकांनी अंदाज व्यक्त केला.
( नक्की वाचा : Katrina Kaif: कतरिना कैफ 42 व्या वर्षी आई होणार, उशिरा मातृत्वाचा ट्रेंड काय आहे? वाचा डॉक्टरांचा सल्ला )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world