टीम इंडियाने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला. यामुळे भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा शिल्लक आहेत. पर्थमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरण झाली होती. तर टीम इंडिया पुन्हा एकदा शीर्ष स्थानावर पोहोचली आहे. त्यानंतर श्रीलंकेविरोधातील विजयानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर पोहोचली, तर ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मात्र आता फायनलमध्ये पोहोचण्याची लढत आणखी चुरशीची बनली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांमध्ये पहिल्या दोन स्थानासाठी लढत होणार आहे. भारताला आपलं स्थान बळकट करण्यासाठी आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आधीची भारताची ही अखेरची टेस्ट सीरिज आहे. त्यामुळे फायनल गाठण्यासाठी भारतासाठी काय समीकरण आहे, यावर एक नजर टाकुया.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : 13 वर्षांच्या मुलाची आयपीएलमध्ये एन्ट्री, भारताकडून झळकावलीय सेंच्युरी )
टीम इंडियाचं फायनलसाठी कसं असेल समीकरण?
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने जिंकली तर.. : भारताने जर ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज जिंकली तर टीम इंडिया इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून न राहता फायनलसाठी पात्र होईल. म्हणजेच भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने जिंकावी लागेल. मात्र भारताच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका 3-1 ने जिंकली तर.. : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरीज जर 3-1 ने जिंकली तर फायनलसाठी क्वालिफाय होईल. मात्र या परिस्थितीत भारताला दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. म्हणजेच, भारताने 3-1 ने सीरिज जिंकली आणि दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा पराभव केल्यास भारत फायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका 3-2 ने जिंकली तर.. : मात्र भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-2 ने जिंकली तर भारतासाठी परिस्थिती कठीण बनेल. त्यानंतर भारताला श्रीलंकेवर अवलंबून राहावं लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-2 ने जिंकल्यानंतर भारताला फायनल गाठायची असेल तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा आणि तिसरा सामना जिंकावा लागेल. याशिवाय 29 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेला किमान एक सामना ड्रॉ करावा लागणार आहे. त्यानंतर भारताचं फायनलमधील स्थान निश्चित होईल.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका अनिर्णित राहिली तर.. : अखेरची शक्यता म्हणजे, बॉर्डर-गावस्कर मालिका अनिर्णित राहिल्यास भारताच्या पात्रतेची शक्यता आणखी कमी होईल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेला सध्याच्या मालिकेत श्रीलंकेचा 2-0 असा पराभव करणे आवश्यक असेल. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका श्रीलंकेला 1-0 अशा फरकाने जिंकावी लागेल. श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 2-0 असा विजय भारताचा मार्ग कठीण करेल. केवळ 1-0 असा विजय टीम इंडियाला पुढे नेण्यास फायदेशीर ठरेल.