जाहिरात

Hulk Hogan: WWE मधील पर्व संपले, सुपरस्टार हल्क होगनचे निधन!

Hulk Hogan: WWE चा सुपरस्टार, प्रसिद्ध रेसलर हल्क होगन यांचे निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते.

Hulk Hogan: WWE मधील पर्व संपले, सुपरस्टार हल्क होगनचे निधन!
Hulk Hogan
मुंबई:

Hulk Hogan: WWE चा सुपरस्टार, प्रसिद्ध रेसलर हल्क होगन यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. टीएमजेड स्पोर्ट्सनुसार, हल्क होगन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. टेरी जीन बोलिया हे त्यांचे खरे नाव होते. पण ते संपूर्ण जगभर हल्क होगन या नावाने ओळखले जात. 

हल्कचा जन्म 11 ऑगस्ट 1953 रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झाला होता. 70 वर्षांपेक्षा जास्त वय असतानाही  रेसलिंगच्या दुनियेत त्यांचा दबदबा कायम होता. होगन यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात डब्ल्यूडब्ल्यूई (तेव्हाचे डब्ल्यूडब्ल्यूएफ) ला नवीन उंचीवर नेले. त्यांचा लाल-पिवळा पोषाख, लांब सोनेरी केस आणि "हल्कमेनिया" हे स्लोगन चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. 

हल्क होगन यांनी सहा वेळा डब्ल्यूडब्ल्यूई वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली आणि रेसलमेनियासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनी अँड्रे द जायंट, रँडी सॅव्हेज आणि द रॉक यांसारख्या रेसलर्ससोबतचे त्यांचे सामने चांगलेच गाजले.  "रॉकी III" आणि "थंडर इन पॅराडाइज" सारख्या चित्रपटांमध्ये आणि टीव्ही शोमध्येही त्यांनी काम केले होते. 

( नक्की वाचा : Rishabh Pant : पंत झुकेगा नही! दुखापतीनंतरही मैदानात उतरला टीम इंडियाचा शेर, 'लॉर्ड' ठाकूरसोबतचा भावनिक Video Viral )
 

गेल्या काही वर्षांत, हल्क होगन यांनी रेसलिंगपासून थोडे दूर होते. पण ते टीव्हीवर आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी ते कनेक्ट होते.   ते त्यांच्या फिटनेस आणि प्रेरणादायी विचारांसाठीही ओळखले जात होते. त्यांच्या आयुष्यात काही वादही होते, पण त्यांना नेहमीच त्यांच्या फॅन्सचा पाठिंबा मिळाला. रेसलिंगला जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात हल्क होगन यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. ते आजही युवा रेसलर्ससाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास मेहनत, जिद्द आणि हिंमतीचे उदाहरण आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com