जाहिरात

Team India : 34 इनिंगमध्ये 11 सेंच्युरी आणि 12 हाफ सेंच्युरी, तरीही टीम इंडियात जागा नाही! कधी संपणार उपेक्षा?

सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2025-26) सध्या एकापेक्षा एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे.

Team India : 34 इनिंगमध्ये 11 सेंच्युरी आणि 12 हाफ सेंच्युरी, तरीही टीम इंडियात जागा नाही! कधी संपणार उपेक्षा?
Devdutt Padikkal
मुंबई:

सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2025-26) सध्या एकापेक्षा एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत 26 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे केरळ आणि कर्नाटक यांच्यात एक अटीतटीची लढत झाली. या सामन्यात कर्नाटकने 10 चेंडू राखून 8 विकेट्सने विजय मिळवला. 

या विजयाचा खरा हिरो जरी करुण नायर ठरला असला, तरी ओपनर देवदत्त पडिक्कलने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ती पाहून निवड समितीला विचार करणे भाग पडले आहे. देवदत्तने या सामन्यात 137 चेंडूत 124 रनची तुफानी खेळी केली. यामध्ये त्याने 12 फोर आणि 3 उत्तुंग सिक्सर्स लगावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

देवदत्तचा जबरदस्त रेकॉर्ड

देवदत्त पडिक्कल सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याचा सध्या कोणीही हात धरू शकत नाही. त्याने आतापर्यंत 35 सामने खेळले असून 34 इनिंग्समध्ये 83.64 च्या सरासरीने 2342 रन बनवले आहेत. विशेष म्हणजे या 34 इनिंग्समध्ये त्याने 11 सेंच्युरी आणि 12 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. 

याचाच अर्थ असा की 34 पैकी 23 वेळा त्याने 50 पेक्षा जास्त स्कोअर केला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 152 रन इतकी आहे. इतकी सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला वनडे संघात संधी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

( नक्की वाचा : VIDEO : 'मी स्वतः येऊन तुझं गळा दाबेन', गावस्कर सचिनला असं का म्हणाले होते? तेंडुलकरचं सडेतोड उत्तर! )
 

टीम इंडियात पुनरागमन कधी होणार?

देवदत्त सध्या 25 वर्षांचा असून तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने भारतीय संघासाठी 2 टेस्ट आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. टेस्ट क्रिकेटच्या 3 इनिंग्समध्ये त्याने 30.00 च्या सरासरीने 90 रन केले आहेत, तर टी20 च्या 2 इनिंग्समध्ये त्याने 38 रन बनवले आहेत. 

सुरुवातीच्या काळात फारशी चमक दाखवता न आल्याने त्याला संघातून वगळण्यात आले  होते. मात्र, आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये रनचा डोंगर उभा करून त्याने पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत.

( नक्की वाचा : Kartik Sharma : 14.20 कोटींच्या सॅलरीचं काय करणार? कार्तिक शर्मानं एका झटक्यात दिलं मनाला भिडणारं उत्तर )
 

करुण नायरची सेंच्युरी

केरळविरुद्धच्या या सामन्यात कर्नाटकच्या विजयात करुण नायरने देखील मोलाचा वाटा उचलला. त्याने तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येत 130 चेंडूत 130 रनची नाबाद खेळी केली. त्याने 100.00 च्या स्ट्राईक रेटने रन वसूल केले. देवदत्त पडिक्कल आणि करुण नायर या जोडीने कर्नाटकला एक सोपा विजय मिळवून दिला. मात्र या संपूर्ण सामन्यात पडिक्कलच्या सातत्यपूर्ण कामगिरीची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. आता निवड समिती या तरुण खेळाडूला वनडे फॉरमॅटमध्ये कधी संधी देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com