रिक्षाचालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणं अनिवार्य करण्यात आलंय. या संदर्भात उद्या मोटार परिवहन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सुधारित नियमांची अंमलबजावणी, चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी तसेच त्यासाठीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर चालकांना व्यवहारिक मराठी येते का याची तपासणी करण्यात येणार आहे.