चाकणमध्ये संतप्त नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलंय. चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून आता उद्योजकांनंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यावेळी घाईघाईने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी धावपळ करणारे प्रशासन आता कुठे गायब झाले? असा सवाल चाकणकरांनी उपस्थित केलाय. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.