बारामती तालुक्यातील गोजुबाई येथे २८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.