काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून पुण्यातील काँग्रेस भावना बाहेर आज जोरदार आंदोलन करण्यात आलं.. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर राज्यभरातून भाजपकडून टीका केली जात आहे.. त्यांनी केलेल्या याच वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून आज काँग्रेस भावना बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधी यांच्या फोटोला टिपू सुलतान यांचा वेश घालत त्यांच्या पोस्टर्सला जोडे मारत घोषणाबाजी करत आंदोलन केलं.. तर भाजपच्या याच आंदोलनाला प्रत्युत्तर देत काँग्रेस भवन च्या आवारात काँग्रेस पक्षाकडून देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली... यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त काँग्रेस भवन परिसरात लावण्यात आला होता.. यावेळी आंदोलन करतान मोठा गोंधळ भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भावनांच्या बाहेर घातलेला पाहायला मिळाला...