चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबावाचा प्रयत्न; विजय पाटकरांचा आरोप, अंधारेंनीही साधला निशाणा

एकीकडे विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतय.. त्यातच चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्याकडून होतोय, असा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केलाय... इतकंच नव्हे तर मला उमेदवारीचा अर्जही भरू दिला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.मी कोल्हापूरला अर्ज पाठवला होता. पण, राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, असे विजय पाटकर यांनी म्हटले होते..दरम्यान, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी जोरदार निशाणा साधलाय .

संबंधित व्हिडीओ