देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचं वितरण उद्या राष्ट्रपती भवनात होणार आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.यावर्षी देशभरातील तब्बल 131 मान्यवरांना हा सन्मान देण्यात येत असून,त्यामध्ये महाराष्ट्रातील 15 दिग्गजांचाही समावेश आहे.कला, उद्योग, सामाजिक कार्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे गौरवण्यात येतं. महाराष्ट्रासाठीही ही अभिमानाची बाब असून राज्यातील अनेक मान्यवरांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. कुणाकुणाला पद्म पुरस्कार मिळणार आहेत पाहुयात ग्राफिक्समधून.