Baba Siddique यांच्या मोबाईल नंबरवरुन ऑनलाईन फसवणुकीचा प्रयत्न, आरोपी दिल्लीतून ताब्यात | NDTV मराठी

दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या मोबाईल नंबरवरुन ऑनलाईन फसवणुकीचा प्रयत्न झालाय. सिद्दीकींच्या हत्येनंतर त्यांचा मोबाइल नंबर दुसऱ्या सिमकार्डवर फसवणुकीने सक्रिय करण्याचा कट उघडकीस आला आहे. या आरोपीचा उद्देश सामान्यांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा होता... परंतु जेव्हा टेलिकॉम कंपनीने हा मेल बाबा सिद्दीकी यांची मुलगी डॉ. अर्शिया सिद्दीकी यांना पाठवला, तेव्हा कुटुंबाला हा प्रकार समजला...डॉ. अर्शिया यांनी तातडीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली...या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिल्लीतील बुराडी परिसरातून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीवर यापूर्वीच अनेक सायबर गुन्ह्यांची नोंद आहे...

संबंधित व्हिडीओ