Beed | गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदीसाठी ग्राहकांची लगबग, बुकिंग करूनही सहा दिवसांची वेटिंग

गुढीपाडव्याच्या सणानिमित्त वाहन बाजारात वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी गाड्यांसाठी ग्राहकांची प्रतीक्षा; बुकिंग करूनही सहा दिवसांची वेटिंग युद्धामुळे पेट्रोल डिझेल च्या किमती वाढल्या तर वाहन बाजारावर परिणाम होईल वाहन व्यवसायिकाची माहिती गुढीपाडव्याचं औचित्य साधत बीडच्या वाहन बाजारात आज ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतीय.. शहरातील दुचाकी आणि चारचाकी शोरूममध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी लगबग दिसून आली. विशेष म्हणजे अनेकांनी आधीच बुकिंग केले असले तरी ग्राहकांना सहा ते सात दिवसांची वेटिंग करावी लागत आहे. कंपन्यांकडून मागणीनुसार गाड्यांचा पुरवठा होत नसल्याने काही वाहनांची कमतरता जाणवत आहे.. दरम्यान गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बीडमध्ये तब्बल ३०० पेक्षा अधिक वाहनांची विक्री झालीय.

संबंधित व्हिडीओ