लोकसभा निकालाचं विश्लेषण आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजप केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत भाजप केंद्रीय नेतृत्त्वानं विधानसभेसाठी road map दिल्याची NDTV च्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे. तर या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान फडणवीसांच्या मंत्रिपदावरून बाजूला होण्याच्या भूमिकेवरून चर्चा होण्याची शक्यता आहे.