पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील मस्तुंग येथे पुन्हा एकदा जाफर एक्स्प्रेसला लक्ष्य करून स्फोट घडवण्यात आलाय. या स्फोटामुळे रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरले. या हल्ल्यात जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पाकिस्तानी सैन्य तातडीने घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. जाफर एक्स्प्रेसवरील हा हल्ला बलुच लिबरेशन आर्मीने केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. यापूर्वी 11 मार्च 2025 मध्ये बलुच आर्मीने हीच रेल्वे हायजॅक केली होती. क्वेट्टाहून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसमधले 100 हून अधिक प्रवासी ओलीस ठेवले आणि पाकिस्तानी सुरक्षारक्षकांना ठार केलं होतं.. पाकिस्तानी सैन्यानं तब्बल 30 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवून जाफर एक्सप्रेस बलुच आर्मीच्या तावडीतून सोडवली होती...