येत्या एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये पंधरा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकरात कपात करतील अशी शक्यता आहे. सध्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध उपाययोजनांवर विचार करतंय. मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहिला तर मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं काही अर्थतज्ज्ञांचं मत आहे. आणि त्याच अनुषंगाने अर्थमंत्रालय त्याचा प्रचार सुरू आहे आणि या विषयावर, देखील अनेक चर्चा विचार विचारण होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे.